Indian Railway : (Indian Railway) रेल्वेने रात्रीचा प्रवास करण्याऱ्यांसाठी एक नवी सुविधा उपलब्ध केली आहे. डेस्टिनेशन अलर्ट वेकअप अलार्म या सुविधेमुळे आता रात्री रेल्वेने प्रवास करणाऱ्यांचे स्टेशन मिस नाही होणार. या सुविधेमुळे आता प्रत्येक प्रवासी रात्री आरामात झोपू शकतो.

रात्रीच्या प्रवासात (Night Travel) ट्रेनमध्ये स्टेशन चुकण्याची चिंता संपेल. ट्रेनमध्ये तुम्ही आरामात झोपू शकता. रेल्वे तुम्हाला स्टेशनवर येण्याच्या 20 मिनिटे आधी उठवेल. यामुळे तुमचे स्टेशन चुकणार नाही आणि तुम्ही तुमची झोप आरामात पूर्ण करू शकाल.

अनेक वेळा ट्रेनमध्ये लोकांना झोप येते, त्यामुळे त्यांचे स्टेशन चुकते. या समस्येवर मात करण्यासाठी ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. हे सहसा रात्री घडते. प्रवाशांची ही दुविधा लक्षात घेता रेल्वेने डेस्टिनेशन अलर्ट वेकअप अलार्म सेवा सुरू केली आहे.

फक्त 3 रुपयात अलर्ट मिळणार आहे (Destination Alert Wakeup Alarm)

रात्री 11.00 ते सकाळी 7.00 या वेळेत प्रवाशांना ही सुविधा उपलब्ध असेल. त्यासाठी रेल्वेकडून केवळ तीन रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे. तुम्ही ही सेवा घेतल्यास, तुमच्या स्टेशनच्या २० मिनिटे आधी तुमच्या फोनवर अलर्ट  पाठवला जाईल. जेणेकरून तुम्ही तुमचे सामान वगैरे व्यवस्थित ठेवू शकता आणि स्टेशनवर आल्यावर ट्रेनमधून उतरू शकता.

अशा प्रकारे वापरा

भारतीय रेल्वेने चौकशी सेवा क्रमांक 139 वर ही सुविधा सुरू केली आहे. ट्रेनमध्ये प्रवास करणारे प्रवासी इन्क्वायरी सिस्टम क्रमांक 139 वर अलर्ट सुविधा मागू शकतात.

या स्टेप्स करा फॉलो

सर्वप्रथम तुम्ही IRCTC हेल्पलाइन 139 वर कॉल करा.
डेस्टिनेशन अलर्ट सेवा सुरू करण्यासाठी कॉल आल्यावर तुमची भाषा निवडा.
सूचनेसाठी, प्रथम क्रमांक 7 आणि नंतर क्रमांक 2 दाबा.
त्यानंतर प्रवाशांकडून 10 अंकी पीएनआर क्रमांक विचारला जाईल.
PNR प्रविष्ट केल्यानंतर, पुष्टी करण्यासाठी 1 डायल करा.
या प्रक्रियेनंतर, सिस्टम PNR नंबर सत्यापित करा आणि वेकअप अलर्ट फीड करा.
त्याचा कन्फरमेशन एसएमएस द्वारे प्रवाशाच्या मोबाईलवर प्राप्त होईल.