मुंबई : इंडियन आयडलच्या १२व्या पर्वातील फायनलिस्ट मराठमोळी गायिका सायली कांबळेने काही दिवसांपूर्वी तिचा बॉयफ्रेंड धवल सोबत साखरपुडा केला आहे. त्यांनतर आता लवकरच सायली लग्नबंधनात अडकणार आहे. या सुंदर क्षणाचे काही फोटो सायलीने तिच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
सायलीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपल्या मांडव स्थापनेचे फोटो शेअर करत सर्वांना आपल्या लग्नाची गोड बातमी दिली आहे. त्यापूर्वी सायलीने आपल्या केळवणाचेसुद्धा फोटो आणि व्हिडीओ देखील शेअर केले होते. सायलीने इंडियन आयडॉलनंतर धवलवर आपलं प्रेम असल्याचं कबुली देत काही दिवसांतच साखरपुडा उरकला होता.
दरम्यान सायलीने साखरपुड्यासाठी खास साऊथ इंडियन लुक केला होता. साखरपुड्याच्या विधीनंतर सायलीने डिझायनर लेहंगा घातला होता. तर धवलने जांभळ्या रंगाची डिझायनर शेरवानी घातली होती. साखरपुड्यानंतर धवलने सायलीला एक खास सप्राइज दिले. याचा व्हिडिओ सायलीने शेअर केला आहे. या व्हिडिओत धवलने सायलीला गुडघ्यावर बसून लग्नाची मागणी घातली. त्यानंतर दोघांनी रोमँटिक डान्स केल्याचे पाहायला मिळते.