भारतातील ‘हा’ 594 किलोमीटर लांबीचा महामार्ग कुंभमेळ्यापूर्वी सुरू होणार ! कसा असेल रूट, कोणत्या भागातील नागरिकांना मिळणार फायदा ?
India New Expressway : महाराष्ट्रासहित सध्या संपूर्ण देशभरात पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. पायाभूत सुविधांमध्ये दळणवळण व्यवस्था मजबूत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. यामध्ये देशातील विविध राज्यात मोठमोठ्या महामार्गांची कामे केली जात आहेत.
नवनवीन रेल्वे मार्ग देखील तयार केले जात आहेत. वंदे भारत एक्सप्रेससारख्या हाय स्पीड ट्रेन चालवल्या जात आहेत. मेट्रो सुरू केल्या जात आहेत. नुकतीच देशाला पहिली रॅपिडेक्स ट्रेन म्हणजे नमो भारत ट्रेन देखील मिळाली आहे. देशातील पहिला सेमी हायस्पीड ट्रेन प्रकल्प दिल्ली ते मेरठ दरम्यान विकसित केला जात असून या संपूर्ण मार्गावर रॅपिडेक्स ट्रेन सुरू केली जाणार आहे.
दरम्यान या सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा पहिला टप्पा सुरू देखील झाला आहे. प्रकल्पाचा पहिला टप्पा साईबाबाद ते दु्हाई दरम्यान विकसित झाला असून या मार्गावर रॅपिडेक्स ट्रेन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरू करण्यात आली आहे. या ट्रेनला नमो भारत ट्रेन असे नाव देण्यात आले आहे. खरंतर, पुढील वर्षी देशात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत.
शिवाय देशातील अनेक राज्यांमध्ये आगामी काही महिन्यात विधानसभा निवडणूकां आयोजित होणार आहेत. अशा परिस्थितीत निवडणुकीचे पडघम आत्तापासूनच वाजु लागले आहेत. सर्वसामान्यांना खुश करण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. यासाठी वेगवेगळी विकास कामे जलद गतीने पूर्ण केली जात आहेत.
सध्या सुरू असलेल्या विविध महामार्गांची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी शासन आणि प्रशासनाकडून प्रयत्न होत आहेत. दरम्यान प्रयागराज येथे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर देशाला एका नवीन महामार्गाची भेट मिळणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. मेरठ ते प्रयागराज यादरम्यान गंगा एक्सप्रेस वे विकसित केला जात असून हा महामार्ग लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी शासनाकडून सूचना देण्यात आल्या आहेत. खरंतर या महामार्गासाठीचे भूमिपूजन 2021 मध्ये झाले होते. 2022 मध्ये या महामार्गाचे प्रत्यक्षात काम सुरू झाले आहे.
म्हणजेच आता काम सुरू होऊन जवळपास एका वर्षाचा काळ उलटला आहे. दरम्यान हा महामार्ग आता प्रयागराज येथे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पूर्वी सुरू करण्याचा शासनाचा प्रयत्न असेल. जानेवारी 2025 मध्ये प्रयागराज या ठिकाणी कुंभमेळ्याचे आयोजन होणार आहे. यामुळे मेरठ ते प्रयागराज यादरम्यान विकसित होणारा गंगा एक्सप्रेस वे डिसेंबर 2024 पर्यंत पूर्ण करण्याचे टार्गेट ठेवण्यात आले आहे. त्यासाठी शासनाकडून संबंधितांना आदेश देण्यात आले आहेत.
त्यामुळे हा महामार्ग ठरवलेल्या वेळेत पूर्ण होईल असा आशावाद व्यक्त होत आहे. हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर या भागातील प्रवाशांचा प्रवास आणखी गतिमान आणि सुरक्षित होईल आणि नागरिकांना वाहतूक कोंडीतून दिलासा मिळेल असा आशावाद व्यक्त होत आहे. या महामार्गाचे आत्तापर्यंत 22 टक्के काम पूर्ण झाले उर्वरित काम जलद गतीने पूर्ण केले जाणार आहे.
या मार्गाचे काम एकूण बारा पॅकेज मध्ये आणि चार टप्प्यांमध्ये काम पूर्ण केले जाणार आहे. हा महामार्ग 594 किलोमीटर लांबीचा असून यामुळे मेरठ ते प्रयागराज हा प्रवास गतिमान होणार आहे. या प्रकल्पाअंतर्गत 18 फ्लायओव्हर आणि 8 रोड ओवर ब्रिज विकसित केले जाणार आहेत.