मुंबई : माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी मंगळवारी भारतीय कर्णधाराबाबत मोठे वक्त्यव्य केले आहे. त्यांच्या मते, इंडियन प्रीमियर लीगच्या 15 व्या हंगामात भारतीय क्रिकेट संघाला भविष्यासाठी ‘बलवान’ कर्णधार मिळेल. आगामी स्पर्धेत ऋषभ पंतपासून केएल राहुल आणि श्रेयस अय्यरपर्यंत कर्णधाराच्या भूमिकेत दिसणार आहेत. या सर्वांमध्ये भारताचा पुढील कर्णधार होण्याची क्षमता आहे का हे पाहावे लागणार आहे.
यावेळी रवी शास्त्री यांनी भारताचा सध्याचा कर्णधार रोहित शर्मा याचे कौतुक करत तो ‘उत्तम’ कामगिरी करत असल्याचेही स्पष्ट केले आहे. आयपीएलपूर्वीच्या पत्रकार परिषदेत शास्त्री म्हणाले, “रोहित सध्या कर्णधार म्हणून उत्कृष्ट कामगिरी करत आहे. पण भविष्यात संघाचे नेतृत्व कोण करणार हे भारताला आता पासूनच पाहावे लागेल, आयपीएलच्या 15 व्या हंगामात भारताचा पुढील कर्णधार कोण असेल यावर लक्ष द्यावे लागेल, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, केएल राहुल सध्या या शर्यतीत आहेत. भारतीय संघ सध्या भविष्यासाठी मजबूत कर्णधाराच्या शोधात असेल आणि आयपीएल ही चांगली संधी आहे.
इंडियन प्रीमियर लीगच्या 15व्या हंगामाची सुरुवात शनिवारी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामन्याने होणार आहे.