team india
IND vs SL: beat Sri Lanka by 238 runs in second Test to win the series 2-0

नवी दिल्ली : बेंगळुरू येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या डे नाईट कसोटी सामन्यात भारताने 238 धावांनी श्रीलंकेचा पराभव केला. यासह भारताने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-0 असा क्लीन स्वीप केला आहे.

दुसऱ्या डे नाईट कसोटी सामन्यात श्रीलंकेचा कर्णधार दिमुथ करुणारत्नेने शतक पूर्ण करत 107 धावा केल्या. त्याचवेळी भारतीय गोलंदाज आर अश्विनने 19.3 षटकात 55 धावा देत 4 बळी घेतले. दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी श्रीलंकेने दिवसाची सुरुवात केली. सोमवारी भारताने नऊ विकेट घेतल्या. टी ब्रेक पर्यंत श्रीलंकेने 39 षटकांत 4 गडी गमावून 151 धावा केल्या होत्या.

तिसऱ्या दिवसाची सुरुवात करुणारत्ने आणि फलंदाज मेंडिस यांनी केली. यादरम्यान करुणारत्ने नशीबवान ठरला, कारण तो अश्विनच्या हातून बाद होण्यापासून वाचला. या सामन्यात मेंडिसने 57 चेंडूत 12वे कसोटी अर्धशतक पूर्ण केले. श्रीलंकेची मालिकेतील सर्वोच्च 97 धावांची भागीदारी अश्विनने मोडली आणि फलंदाज मेंडिसला पंतने झेलबाद केले.

त्यानंतर श्रीलंकेचा एकही फलंदाज संघासाठी सामना जिंकण्यासाठी पुरेशी धावसंख्या करू शकला नाही आणि निरोशन डिकवेला (यष्टीरक्षक) वगळता सर्व फलंदाज 10 धावांच्या आत बाद झाले. यावेळी निरोशन डिकवेला 12 धावा करून गोलंदाज अक्षर पटेलच्या षटकात झेलबाद झाला.

गोलंदाज आर अश्विनने आपल्या गोलंदाजीने श्रीलंकेच्या फलंदाजांना खूप त्रास दिला, त्याने फलंदाजांवर दबाव कायम ठेवला आणि शेवटपर्यंत विकेट घेत राहिला. यावेळी अश्विनने चार विकेट घेतल्या. यानंतर, पहिल्या डावात श्रीलंकेचे पाच बळी घेणारा दुसरा गोलंदाज जसप्रीत बुमराह यानेही या डावात तीन विकेट्स घेण्यात यश मिळवले.

गोलंदाज अक्षर पटेलही मागे राहिला नाही आणि त्यानेही निरोशन डिकवेला आणि चरिथ अस्लंका यांच्या विकेट्स घेतल्या. त्याचवेळी रवींद्र जडेजानेही एक विकेट घेतली. यादरम्यान श्रीलंकेचा डाव 59.3 षटकांत 208 धावांत गुंडाळला गेला.