BSE
BSE

कर्जबाजारी सिंटेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड (Syntex Industries Limited) सध्या दिवाळखोरीच्या निराकरण प्रक्रियेतून जात आहे. येत्या काही दिवसांत सिंटेक्स इंडस्ट्रीज ही उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या आरआयएल कंपनीची होणार आहे. कारण सिंटॅक्सच्या कमिटी ऑफ क्रेडिटर्सने (COC) RIL आणि ACRE ने सादर केलेल्या संकल्प योजनेला मान्यता दिली आहे.

खरं तर सिंटेक्स इंडस्ट्रीजने एक्सचेंजला सांगितले आहे की, RIL आणि ACRE ने संयुक्तपणे आणलेल्या रिझोल्यूशन प्लॅनमध्ये कंपनीचे विद्यमान भाग भांडवल शून्यावर आणले जाईल आणि कंपनीला BSE आणि NSE मधून डिलिस्ट केले जावे.

RIL लवकरच सिंटेक्स इंडस्ट्रीज ताब्यात घेणार आहे –
दरम्यान रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये सिंटेक्सचे नाव जोडताच काही गुंतवणूकदारांनी शेअर्स खरेदी करण्यास सुरुवात केली. तर एक्सचेंज फाइलिंगमध्ये हे स्पष्ट करण्यात आले आहे की, सिंटेक्स इंडस्ट्रीजला BSE आणि NSE मधून डिलिस्ट केले जाईल. सोमवारी सिंटेक्स इंडस्ट्रीजचा समभाग 5 टक्क्यांनी लोअर सर्किट घेत 7.80 रुपयांवर बंद झाला.

नितीन कामत यांनी इशारा दिला –
ऑनलाइन स्टॉक ब्रोकरेज कंपनी झेरोधाचे संस्थापक आणि सीईओ नितीन कामत (Nitin Kamat) यांनी गुंतवणूकदारांना सावध केले की, गुंतवणूकदार अजूनही त्यांच्या प्लॅटफॉर्मवर सिंटेक्सचे शेअर्स खरेदी करत आहेत, तर येत्या काही दिवसांत शेअरचे मूल्य शून्य होणार आहे.

म्हणजेच स्टॉकची किंमत 0 वर सेट केली आहे. नितीन कामत यांनी चिंता व्यक्त करताना सांगितले की, गुंतवणूकदार माहितीअभावी सिंटेक्स इंडस्ट्रीजचे शेअर्स खरेदी करत आहेत. गुंतवणुकदार केवळ स्वस्त मिळत असल्याने शेअर खरेदी करत आहेत. पण खरे कारण त्यांना माहीत नाही.

चुकूनही खरेदी करू नका –
तुम्ही सिंटेक्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्येही पैसे गुंतवले असतील तर तुमची संपूर्ण गुंतवणूक शून्य होणार आहे. कारण सिंटेक्स इंडस्ट्रीजचे इक्विटी शेअर्स डिलिस्ट केले जातील आणि दिवाळखोरी रिझोल्यूशन प्रक्रियेअंतर्गत इक्विटी शून्य राहील. अशा परिस्थितीत तुमच्याकडे सिंटेक्सचे शेअर्स असतील तर लवकर विकून टाका.

अरमानी (Armani), ह्यूगो बॉस (Hugo Boss), डिझेल (Diesel) आणि बर्बेरी सारख्या लक्झरी फॅशन ब्रँडला कपड्यांचा पुरवठा करणाऱ्या सिंटेक्सकडे 27 कर्जदारांकडून एकूण 7,534.60 कोटी रुपये शिल्लक आहेत. फॅब्रिक व्यवसायाशी संबंधित सिंटॅक्समध्ये एरेस एसएसजी कॅपिटलचा मोठा हिस्सा आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, वर्ष 2017 मध्ये सिंटेक्स प्लॅस्टिक तंत्रज्ञान सिंटेक्स इंडस्ट्रीजपासून वेगळे केले गेले. सिंटेक्स प्लास्टिक तंत्रज्ञान पाणी साठवण टाक्या बनवते.