
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी, तिचे कुटुंब आणि बिझनेसमन पती राज कुंद्रासाठी यांच्यासाठी मागील वर्ष खूप कठीण गेले. अश्लील चित्रपट बनवून ते ऑनलाइन प्रसारित केल्याबद्दल राज कुंद्राला तुरुंगात जावे लागले आणि सुमारे 3 महिने त्याने तुरुंगात काढले. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर राज कुंद्रा मीडियापासून लांब पळत आहे आणि त्याने त्याचे सोशल मीडिया अकाउंटही डिलीट केले आहे. जरी तो अनेकदा त्याच्या कुटुंबासह स्पॉट झाला असला तरी तो मीडियापासून दूर राहण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसतो.
आता नुकताच तो पुन्हा मुंबईतील एका रेस्टॉरंटबाहेर स्पॉट झाला. जिथे तो शमिता शेट्टी आणि राकेश बापट यांच्यासोबत डिनरसाठी आला होता. राज कुंद्रा रेस्टॉरंटमध्ये पोहोचताच पापाराझींना पाहून त्याने आपला चेहरा लपवला. मात्र, रेस्टॉरंटमध्ये प्रवेश केल्यानंतर त्याने हुडी काढली. पण, चेहरा लपवल्यामुळे राज कुंद्रा पुन्हा एकदा ट्रोलच्या निशाण्यावर आला आहे.
अश्लील चित्रपटाच्या मुद्द्याकडे लक्ष वेधत युजर्स व्हिडिओवर भरपूर कमेंट करत आहेत. एका यूजरने लिहिले, ‘असे करताना चेहरा का लपवावा लागतो? ‘आणखी एक युजर लिहिले, ‘अशी कामे केलीत की उन्हाळ्यातही हुडी घालून फिरावे लागते. तर आणखी एकाने लिहिले, ‘तो इतका विनम्र आहे की तो आपला चेहरा देखील दाखवत नाही.’ इतर अनेक वापरकर्त्यांनी अशीच कमेंट करून राज कुंद्राला लक्ष्य केले आहे.
अलीकडेच राज कुंद्रा त्याच्या कुटुंबासोबत स्पॉट झाला होता. तो आपल्या कुटुंबासह ‘द बॅटमॅन’ पाहण्यासाठी आला होता आणि येथेही तो चेहरा लपवताना दिसला. अश्लील चित्रपट प्रकरणात, तुरुंगातून बाहेर आल्यानंतर राज कुंद्राने सार्वजनिक ठिकाणी येणे कमी केले आहे. असे काही प्रसंग येतात जेव्हा ते स्पॉट होतो त्यावेळी तो पापाराझींना टाळण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो.