मुंबई : अभिनेत्री हेमांगी कवी तिच्या बिनधास्त स्वभावामुळे ओळखली जाते. ती सोशल मीडियावर वेगवेगळ्या मुद्यावर कायम मत मांडत असते. मात्र, यामुळे हेमांगीला सतत ट्रोलिंगचा सामाना करावा लागतो. या सतत होणाऱ्या ट्रोलिंगवर आता हेमांगीने मत मांडलं एक लांब लचक पोस्ट लिहिली आहे.हेमांगी कवीने ही पोस्ट फेसबुक केली आहे. या पोस्टमध्ये तिने म्हटलं की, ‘माझ्या लक्षात आलंय की मी लहानपणापासून खूप कमी वेळा रडलेय. क्वचितच. स्वतःवर तर कधीच नाही. खरंच नाही. हे बरोबर की चूक हे ही मला कळत नाही. म्हणूनच की काय माझा बाकीचा रडण्याचा कोटा मला माझ्या कामातून भरून काढावा लागतो! नाटकात, मालिका- चित्रपटांमध्ये मी इतकी रडलीये ना काय सांगू! इतकी की माझ्या माणदेशातल्या दुष्काळी भागांचा पाण्याचा प्रश्न सुटेल. काही लोकांना माझं स्क्रीन वरचं रडणं इतकं खरं वाटतं की ते रडायला लागतात, त्यांचा गैरसमज होतो की मी आयुष्यात खूप काही भोगलंय म्हणूनच माझ्या कामात ते दिसतं वगैरे! त्यांचा हा गैरसमज मला सुखावतो कारण म्हणजे मी बरं काम करते हा माझा समज होतो.’
‘काही वेळाने मला जखम झालीये हे मी चक्क विसरून जाते, सोडून देते, जखम तिचा वेळ घेऊन तिची तिची बरी होत जाते. मला कळत नाही. No औषध no मलम. हा माझा over confidence असेल कदाचित पण मी लहानपणी cycle चालवताना पडलीये, bike शिकताना पडलीये तेव्हा खूप लागलं ही होतं पण त्यावेळी ना मी कधी फार लक्ष दिलं ना घरच्यांनी. कित्येक वेळा खिळे बिळे लागलेत. लाकूड लागलंय, त्याचे व्रण ही आहेत अंगावर पण फार फार तर कैलास जीवन हे ointment लावण्यापलिकडे माझी गाडी कधी पुढे सरकलीच नाहीए. त्यामुळे आता पर्यंत तरी मी बरी आहे, म्हणून आला असेल हा अति शहाणपणा! पण माझा dna तसा असेल, आई वडिलांचे संस्कार तसे असतील, आजूबाजूच्या परिस्थितीने शिकवलं असेल पण एका अर्थी मी strong आहे हे नक्की आणि त्यासाठी मी कायम grateful राहीन.’
‘तर…. सांगायचा मुद्दा काय तर इतक्या वर्षात मी एक observe केलंय जी लोकं आपल्या शरीरावरच्या साध्या जखमेवर ही overreact होतात, operation झाल्यासारखं उपाय करत बसतात ना ती लोकं मनाच्या जखमेलाही खूप काळ कुरवळत बसतात, उपाय शोधत आणि करत बसतात, अधिकाधिक दुःखी होतात आणि त्यांच्या आजूबाजूच्या लोकांना पण कामाला लावतात. किरकोळ जखम झाल्यावर ती सोडून द्यावी, ती बरोबर भरून निघते. आपलं शरीर एक जादू आहे आणि त्यात एक solid doctor लपून आपला उपाय करत असतो हे कुणी नव्याने सांगायला नको. मन सुद्धा शरीरातलाच एक भाग! हृदयाला connected असलेला मेंदू जवळचा! त्या भागाला जखम झाली तर त्याला किती महत्व द्यावं हे एकदा ठरवलं ना की सगळं ठीक होतं! सोडून देणे हा सर्वात उत्तम रामबाण उपाय!’ Social media वर झालेलं trolling, कुणी मला काही बोललं आणि जर ते माझ्या मनाला लागलं तर मी हे असंच सोडून देते!’ अशी लांबलचक पोस्ट हेमांगी कवीने केली आहे. तिच्या या पोस्टला चाहत्यांनी देखील सहमती दर्शवली आहे.