JADEJA
"I will not bow down", Jadeja got fever of 'Pushpa' in the current match

नवी दिल्ली : लखनऊ येथे गुरुवारी खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताने श्रीलंकेचा 62 धावांनी पराभव केला. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात रवींद्र जडेजाने पुनरागमन केले. मात्र, या सामन्यात जडेजाला फक्त 4 चेंडू खेळायला मिळाले आणि तो 3 धावांवर नाबाद राहिला.

त्यानंतर गोलंदाजी करायला आलेल्या जडेजाने कर्णधार रोहित शर्माला अजिबात निराश केले नाही. जडेजाने चार षटकांत केवळ २८ धावा देत एक विकेट घेतली. यावेळी जडेजाने दिनेश चंदीमलची विकेट घेतली. दिनेशला बाद केल्यानंतर जडेजाने सेलिब्रेशन पाहण्यासारखे होते. त्याचा हाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

जडेजाने दिनेशला बाद केल्यानंतर ‘पुष्पा’ चित्रपटातील अभिनेता अल्लू अर्जुनच्या शैलीत अभिनय करून सेलिब्रेशन केले. चाहत्यांनाही जडेजाचा हा उत्सव खूप आवडला आणि त्यांनी त्याचा हा व्हिडिओ शेअर करण्यास सुरुवात केली.

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, जडेजा व्यतिरिक्त इतर गोलंदाजांनीही चमकदार कामगिरी करत सुरुवातीपासूनच श्रीलंकेवर दबाव आणला. टीम इंडियाने पहिला एकदिवसीय सामना जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. अशा स्थितीत पुढील सामना श्रीलंकेसाठी ‘करो या मरो’ असणार आहे कारण दुसरा टी-20 गमावल्यास ते मालिका गमावतील.