मुंबई : आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळं चर्चित असणारी अभिनेत्री कंगना राणौत ओटीटी प्लॅटफॉर्मवर चालू असणारा ‘लॉक-अप’ हा शो हॉस्ट करत आहे. या शोमध्ये राहण्यासाठी स्पर्धक दररोज नवीन नवीन खुलासे करत असतात. आता या शोमध्ये स्पर्धक शिवम शर्माने आपलं असं गुपित शेअर केलं आहे. ज्यामुळे सर्वांना धक्का बसला आहे.

लॉक-अपमध्ये असलेल्या स्पर्धकांकडून प्रेक्षकांना दररोज अनेक मसालेदार बातम्या मिळत आहेत. मात्र यावेळी आणखी धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये नामांकन टाळण्यासाठी शिवमने पहिल्यांदा बजर वाजवून आयुष्यातील सर्वात मोठे रहस्य उघड केले.

शोमध्ये शिवम म्हणाला, “मी माझ्या आईच्या मैत्रिणीशी शारीरिक संबंध ठेवले होते. ही गोष्ट तो कॉलेजमध्ये असतानाची आहे. आईच्या मैत्रिणीचा घटस्फोट झाला होता. त्यामुळेच दोघांच्या इच्छेने हे नाते निर्माण झाले होते.”

तसेच, शिवम पूढे सांगतो, “शेजारी राहणारी वहिनी माझ्या आईची चांगली मैत्रीण होती. तिचा घटस्फोट झाला होता आणि मला तिच्या लैंगिक जीवनात तिला मदत करायची होती. मी उत्कृष्ट पास्ता बनवायचो आणि आईच्या मैत्रिणीकडे घेऊन जायचो. यानंतर आम्ही दोघेही एकत्र वेळ घालवाचे.”

शेवटी शिवम म्हणाला, “दोन व्यक्तींमधील परस्परसंमतीचे नाते चुकीचे नाही. ही गोष्ट जवळपास 8-9 वर्षे जुनी आहे. शेजारची वहिनी आता म्हातारी झाली आहे. आम्ही दोघंही आता आयुष्यात पुढे गेलो आहोत.” शिवमने य संपूर्ण सीनला ‘प्यार लो, प्यार दो’चा टॅग दिला. शिवमच्या या खुलाशाने बबिता फोगट खूपच हादरलेली दिसली.