rishbh rohit
I consult Rishabh Pant; Rohit's statement under discussion

नवी दिल्ली : श्रीलंकेविरुद्ध मिळालेल्या विजयानंतर कर्णधार रोहित शर्माने एका खेळाडूबाबत मोठे विधान केले आहे. हा खेळाडू दुसरा कोणी नसून यष्टिरक्षक रिषभ पंत आहे. रोहित शर्माने यावेळी मी रिषभ पंतचा सल्ला घेत आल्याचे बोलले आहे.

सामन्यानंतर रिषभ पंतबद्दल बोलताना रोहित शर्मा म्हणाला, “पंत यष्टीमागे चांगली कामगिरी करत आहे आणि त्याला भरपूर ज्ञानही आहे. त्यामुळे त्याच्याकडून सल्ला घेणे ही वाईट गोष्ट नाही. ऋषभ पंत यष्टीमागे कीपिंग करतो ते एक आव्हान आहे. चेंडू किती फिरतोय हे त्याला मागून कळतं. वेगवान गोलंदाजांच्या वेळी ऋषभला स्विंग किंवा रिव्हर्स स्विंगचीही माहिती मिळते. मी त्याला काही गोष्टी विचारतो ही वाईट गोष्ट नाही. त्याने गेल्या वर्षी आयपीएलचे कर्णधारपदही भूषवले होते.”

पुढे बोलताना रोहित म्हणाला, “मी अनेकवेळा रिषभ सोबत खेळाबाबत चर्चा करत असतो. त्याला खेळ चांगला समजतो. इतकी वर्षे तो खेळत आहे त्यामुळे त्याच्याकडे ज्ञानही भरपूर आहे.”

या दोन कसोटी सामन्यांमध्ये ऋषभ पंतने उत्कृष्ट फलंदाजी केली आहे हे लक्षात घेण्यासारखे आहे. त्यामुळेच त्याला मालिकावीर म्हणूनही सन्मानित करण्यात आले. भारतीय संघाने बेंगळुरू कसोटी सामना अवघ्या तीन दिवसांत जिंकला. श्रीलंकेच्या संघाला २३८ धावांच्या मोठ्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला. सामन्याच्या दोन्ही डावात अर्धशतके झळकावणाऱ्या भारतीय फलंदाज श्रेयस अय्यरला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. भारतीय संघाने बॅटिंग तसेच बॉलिंगमध्ये उत्कृष्ट खेळ दाखवला.