Hybrid VS Petrol Engine : वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर ऑटोमोबाईल्सच्या क्षेत्रात सतत नवनवीन तंत्रज्ञान विकसित केले जात आहे, यामुळेच अनेक गाड्यांमध्ये पेट्रोल इंजिन (Petrol Engine) ऐवजी हायब्रीड इंजिन मिळू लागले आहे. यामुळे कारचे मायलेज मोठ्या प्रमाणात वाढते आणि चार्जिंगचीही आवश्यकता नसते. जाणून घ्या पेट्रोल इंजिन आणि हायब्रिड इंजिनमध्ये फरक.
पेट्रोल इंजिन कसे कार्य करते
पेट्रोल इंजिन, प्रामुख्याने अंतर्गत ज्वलन तंत्रज्ञानावर कार्य करते. यामध्ये इंजिनच्या कम्बशन चेंबरमध्ये पेट्रोल जळते आणि त्यातून निर्माण होणाऱ्या ऊर्जेमुळे चाकांना शक्ती मिळते आणि जळलेल्या पेट्रोलचा धूर एक्झॉस्ट पाईपमधून बाहेर पडतो. सध्या देशातील बहुतांश कार या तंत्रज्ञानावर काम करतात.
हायब्रिड इंजिन कसे कार्य करते
एक हायब्रीड(Hybrid Engine) वाहन हे नियमित ICE पेट्रोल इंजिन आणि इलेक्ट्रिक पॉवरट्रेनच्या मिश्रणातून बनवले जाते. हे पेट्रोल आणि इलेक्ट्रिक यांचे मिश्रण आहे. देशात विकल्या जाणार्या हायब्रीड कार सामान्यत: पेट्रोलवर चालवल्या जातात परंतु जेव्हा वेग कमी केला जातो तेव्हा त्या स्वयंचलितपणे इलेक्ट्रिक कार म्हणून कार्य करण्यास सुरवात करतात.
फायदा
हायब्रीड कार हाय स्पीडवर चालवताना पेट्रोलचा वापर करून चांगली कामगिरी देतात, तर कमी स्पीडमध्ये हे इंजिन पेट्रोलऐवजी बॅटरी पॉवरवर चालते. ही बॅटरी रिजनरेटिव्ह ब्रेकिंग बॅटरी तंत्रज्ञानाने आपोआप चार्ज होत राहते आणि ती वेगळी चार्ज करण्याची गरज नसते. त्यांना प्लग-इन-हायब्रिड कार म्हणतात. तथापि, ते EV मोडवर फार लांब अंतरासाठी चालवले जाऊ शकत नाही.
हायब्रीड कार
भारतातील काही प्रमुख संकरित वाहनांमध्ये Honda City Hybrid आणि Toyota Camry Hybrid आणि अलीकडेच लाँच झालेली मारुती सुझुकी ग्रँड विटारा स्ट्रॉंग हायब्रिड, टोयोटा अर्बन क्रूझर हायराइडर हायब्रीड यांचा समावेश आहे.