मुंबई : बॉलीवूडचे लोकप्रिय कपल अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहलीचे लाखो चाहते आहेत. हे कपल सोशल मीडियावरही कायम ट्रेंडिंगला पाहायला मिळते. दरम्यान, अनुष्काने नुकतंच तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर पती विराट कोहलीसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो पाहून सगळ्यांनाच त्यांच्या जोडीचा अंदाज आवडला आहे.

या फोटोमध्ये काळ्या रंगाच्या सूटमध्ये विराट आणि फ्रिल गाऊनमध्ये अनुष्का अप्रतिम दिसत आहेत. यावेळी दोघांनीही अशा पोझ दिल्या आहेत की तुम्हाला फोटोवरून डोळे हटवणे कठीण होईल. यात खास गोष्ट अशी की या फोटोंवर फक्त चाहतेच नाहीतर विराटही फिदा झाला आहे. तसेच, अनुष्काच्या या रोमँटिक फोटोंवर विराटने केलेली कमेंट ही खूप खास आहे. त्यात लिहिले ‘उफ टू हॉट’ अशी मस्त कमेंट केली आहे.

11 डिसेंबर 2017 रोजी विराट आणि अनुष्का शर्माचे लग्न झाले. दोघांना आता वामिका नावाची गोंडस मुलगी आहे. मात्र, त्यांनी आपल्या मुलीला सर्व प्रकारच्या लाईम लाईटपासून दूर ठेवले आहे.