मुंबई : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन आणि सबा आझाद यांच्या कथित अफेअरच्या बातम्या सतत येत असतात. दोघांनी लवकरच लग्न करावे अशी त्यांच्या चाहत्यांकडून इच्छा देखील व्यक्त केली जाते. या अफेरच्या बातम्यांवर सबा किंव्हा हृतिक यांपैकी कोणीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, दोघे एकमेकांची सतत काळजी घेताना दिसतात. यामुळे त्यांच्या अफेरच्या चर्चांना कायम उधाण येत. दरम्यान, दोघांनी पुन्हा एकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव केला आहे.

सबा आझाद नुकतीच एका कार्यक्रमासाठी पुण्यात आली होती. कार्यक्रमापूर्वी तिने इन्स्टाग्राम अकाउंटवर सेटवरील एक व्हिडिओ शेअर केला होता. हाच व्हिडिओ हृतिक रोशनने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. यासोबत त्यांनी लिहिले की, ‘काश मी यासाठी तिथे असतो.’ यासोबतच त्यांनी सबा आझादला एक अद्भुत महिला असल्याचेही सांगितले.

केवळ हृतिक रोशनच नाही तर त्याची आई पिंकी रोशन आणि त्याची माजी पत्नी सुझैन खानही सबाचे कायम कौतुक करताना दिसतात. तसेच, तिला घरचे जेवण पाठवून तिची काळजी घेतात. या सर्व गोष्टी सबा तिच्या सोशल मीडियावरून चाहत्यांसोबत शेअर करत असते.