Honda : (Honda) होंडा लवकरच आपली इलेक्ट्रिक स्कुटर आणि इलेकट्रीक बाइक बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. यासाठी होंडा solid state battery आणि flex fuel या इंजिनवर काम करत आहे. सुरक्षेच्या दृष्टीने हे इंजिन अत्यंत उत्तम राहील.

होंडाने सांगितले की कंपनी 2025 पर्यंत 10 किंवा अधिक इलेक्ट्रिक दुचाकी (Electric Vehicles) बाजारात आणणार आहे. या दुचाकींमध्ये इलेक्ट्रिक स्कूटर, मोटारसायकली, मोपेड आणि सायकलीसह होंडाच्या काही मजेदार इलेक्ट्रिक बाइक्सचा समावेश आहे. तथापि, विद्युत क्षेत्रावर अधिक लक्ष केंद्रित करण्याचे एक कारण म्हणजे कार्बन उत्सर्जन कमी करणे.

होंडा ज्या मॉडेल्सवर काम करत आहे, त्यात काही मॉडेल्सची इंजिने फ्लेक्स-इंधनानुसार विकसित केली जात आहेत. होंडा इलेक्ट्रिक मॉडेल्ससाठी सॉलिड-स्टेट बॅटरी स्वतः तयार करण्याचा प्रयत्न करत आहे. जर होंडा फ्लेक्स इंधन बॅटरी बनवण्यात यशस्वी झाली तर त्याचा थेट परिणाम इलेक्ट्रिक दुचाकींच्या किमतीवर होईल.

Solid-State Batteries & Flex Fuel

सॉलिड-स्टेट बॅटरियांमध्ये घन पदार्थ असतो (Solid State Battery), त्यामुळे त्यांच्या लहान आकारामुळे त्या छोट्या जागेत बसवता येतात. तसेच, त्यात आग लागण्याचा धोका कमी आणि अधिक पॉवर बॅकअप आहे.

जर आपण फ्लेक्स इंधनाबद्दल बोललो तर पेट्रोल आणि इथेनॉल मिसळून फ्लेक्स-इंधन (Flex Fuel) तयार केले जाते. ज्यासाठी इंजिन बदलणे आवश्यक आहे आणि होंडा त्यावर काम करत आहे.

कंपनी 2023 पर्यंत 20% फ्लेक्स-इंधन क्षमता असलेली इंजिने आणि 2025 पर्यंत 100% फ्लेक्स-इंधन क्षमतेची इंजिने लॉन्च करण्याच्या योजनेवर काम करत आहे. देशात सध्या वापरल्या जाणार्‍या इंधनात (पेट्रोल) 10% पेक्षा कमी इथेनॉल आहे.