मुंबई : कन्नडा सुपरस्टार यशचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘KGF Chapter- 2’ ने थिएटरमध्ये धमाकेदार पदार्पण केले आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठमोठे रेकॉर्ड हादरण्यास सुरुवात केली आहे. इकतेच नाही तर पहिल्याच दिवशी या चित्रपटाने अमेरिकन बॉक्स ऑफिसवर आपले नाव कमावले आहे. यामुळे चित्रपट पहिल्याच दिवशी यूएस बॉक्स ऑफिसवर $1 मिलियन क्लबमध्ये सामील झाला आहे.
माहितीनुसार, दक्षिण सुपरस्टार यश, संजय दत्त आणि रवीना टंडन स्टारर चित्रपट ‘KGF 2’ ने बॉक्स ऑफिसवर धमाकेदार सुरुवात केली आहे. यूएसमध्ये पहिल्याच दिवशी हा चित्रपट 1 मिलियन डॉलरच्या क्लबमध्ये सामील झाल्याने ही कामगिरी करणारा हा पहिला कन्नड चित्रपट ठरला आहे. त्यामुळे यशचे चाहते आनंदाने नाचू लागले आहेत.
हिंदी बॉक्स ऑफिसवरही धमाका करत चित्रपटाने पहिल्याच दिवशी तब्बल 53.95 कोटींची कमाई केली आहे. त्यानंतर या चित्रपटाने आतापर्यंतच्या टॉप 10 हिंदी ओपनिंग चित्रपटांच्या यादीत पहिले स्थान मिळवले आहे. ‘KGF Chapter- 2’ चित्रपटाने हृतिक रोशन-टायगर श्रॉफ स्टारर फिल्म ‘वॉर’ आणि आमिर खान स्टारर ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’च्या पहिल्या दिवसाच्या ओपनिंग नंबरलाही मागे टाकले आहे.