team india women
History made by Jhulan Goswami; The first woman cricketer to do so

नवी दिल्ली : भारतीय महिला संघाची अनुभवी वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीने आणखी एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. या खेळाडूने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 250 बळी पूर्ण केले आहेत.

झुलन गोस्वामीने आपल्या 199 व्या सामन्यात ही कामगिरी केली. हा पराक्रम करणारी ती जगातील एकमेव क्रिकेटपटू आहे. या विक्रमासह इतर सर्व खेळाडूंना मागे सोडले आहे. दुसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचीफिट्जपैट्रिक आहे, जिने आपल्या एकदिवसीय कारकिर्दीत 109 सामन्यांत 180 विकेट्स घेतल्या.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात झुलन गोस्वामीने विश्वचषकात सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम केला होता. झुलन गोस्वामीने आता वर्ल्ड कपमध्ये 40 पेक्षा जास्त विकेट घेतल्या आहेत. तिने ऑस्ट्रेलियाची माजी गोलंदाज लिन फुलस्टनचा 39 विकेट्सचा रेकॉर्ड मोडला आहे.

झुलन गोस्वामीने अनेक मोठे रेकॉर्ड आपल्या नावावर केले आहेत. 2007 मध्ये, तिला ICC महिला क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ती एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारी गोलंदाज देखील आहे. 39 वर्षीय झुलनचे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न अद्याप पूर्ण झालेले नाही. या विश्वचषकात भारतीय महिला संघाला विजयासह निरोप देता येईल का, हे पाहणे बाकी आहे. हा तिचा शेवटचा विश्वचषक असू शकतो.