Health Tips : (Health Tips) ड्रॅगन फ्रुट (Dragon Fruits) हे अनेक आजारांवर रामबाण पर्याय मानला जातो. उत्तम आरोग्यासाठी हे फळ अत्यंत फायदेशीर मानले जाते. रोजच्या आहारात ड्रॅगन फ्रुटचा समावेश केल्यास अनेक आजरांपासून बचाव होऊ शकतो, जाणून घ्या ड्रॅगन फ्रूटचे हे जबरदस्त फायदे. (Benefits)

ड्रॅगन फ्रूटमध्ये भरपूर पोषक असतात, ज्यामुळे तुम्ही अनेक आजारांवर मात करू शकता. त्यामुळे त्वचेवरून केस गळण्याची समस्या कमी होऊ शकते. तसंच ड्रॅगन फ्रूट हे मधुमेहातही खूप आरोग्यदायी मानलं जातं.

यामध्ये फॅटी अॅसिड, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, कॅल्शियम यांसारखे पोषक घटक आढळतात, ज्यामुळे अनेक समस्यांपासून आराम मिळतो.

Dragon Fruits चे फायदे

त्वचेपासून केसांपर्यंतच्या समस्या ड्रॅगन फ्रूटच्या सेवनाने दूर होऊ शकतात.

त्वचा निरोगी ठेवते

ड्रॅगन फ्रूट्स त्वचेशी संबंधित विकार दूर करण्यासाठी खूप आरोग्यदायी आहेत. या फळापासून तुम्ही नैसर्गिक फेस पॅक तयार करू शकता, ज्यामुळे तुमची त्वचा हायड्रेट राहते. यामुळे त्वचेवर ग्लो येतो. ड्रॅगन फ्रूटमध्ये असलेले फॅटी अॅसिड एक्जिमा, सोरायसिस सारख्या समस्या दूर करू शकतात. याशिवाय यामध्ये व्हिटॅमिन बी3 आढळते ज्यामुळे त्वचा तरुण राहण्यास मदत होते.

केस निरोगी ठेवते

ड्रॅगन फ्रूट तुमच्या त्वचेसाठी हेल्दी तर आहेच पण त्याचा वापर करून तुम्ही तुमचे केसही निरोगी ठेवू शकता. या फळामध्ये असलेले फॅटी अॅसिड केसांमधील कोंड्याची समस्या कमी करण्यास मदत करतात.

साखरेची पातळी नियंत्रित करते

ड्रॅगन फ्रूट रक्तातील साखर नियंत्रित करू शकते. त्यात अँटीऑक्सिडंट्स जसे की झफ्लाव्होनॉइड्स, एस्कॉर्बिक अॅसिड, फेनोलिक अॅसिड आणि फायबर असतात जे साखरेची पातळी नियंत्रित करतात. याच्या सेवनाने तुम्ही मधुमेहावर बऱ्याच प्रमाणात नियंत्रण ठेवू शकता.

कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवण्यास उपयुक्त

शरीरातील वाढलेले कोलेस्टेरॉल हे अनेक आजारांचे कारण असू शकते. विशेषत: यामुळे हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघाताचा धोका असतो. कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवायचे असेल तर ड्रॅगन फळे खा.