amitabh bachhan
amitabh bacchan in new look

मुंबई : अमिताभ बच्चन हे अशा स्टार्सपैकी एक आहेत जे सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. ते नेहमीच सोशल मीडियावर आयुष्यातील प्रत्येक क्षण चाहत्यांसोबत शेअर करत असतात. दरम्यान, आता बिग बींनी त्यांचा लेटेस्ट फोटो शेअर केला आहे, जो चाहत्यांना खूप आवडला आहे.

या फोटोची खास गोष्ट म्हणजे यात बिग बींवर होळीचा रंग दिसत आहे. बिग बींनी खाजगी जेटमधून त्यांचा हा फोटो शेअर केला आहे. या फोटोत त्यांचे गुलाबी रंगाचे केस दिसत आहेत. फोटो शेअर करत बिग बींनी लिहिले, “प्रवास आणि गुलाबी रंग, नवीन दिवस, नवीन चित्रपट.” बिग बी सध्या त्यांच्या नवीन चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. बिग बींनी शेअर केलेला हा फोटो त्यांच्या नवीन चित्रपटातील लूक आहे.

बिग बींचे अनेक चित्रपट रिलीजसाठी तयार आहेत ज्यात झुंड हा चित्रपट रिलीज झाला आहे. रनवे 34 आणि गुडबाय हे चित्रपट अजूनही रिलीज झालेले नाहीत. झुंड चित्रपटाला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला. दरम्यान, रनवे 34 चा ट्रेलर लवकरच येत आहे ज्यात अजय देवगण, रकुल प्रीत सिंह मुख्य भूमिकेत आहेत. अजयने या चित्रपटाचे दिग्दर्शनही केले आहे.

त्याचबरोबर रश्मिका मधाना अमिताभ बच्चन यांच्यासोबत गुडबायमध्ये दिसणार आहे. रश्मिकाचा हा दुसरा बॉलिवूड चित्रपट आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून दोघेही पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत.