Maharashtralive24.com
Maharashtra Breaking News Updates

हवामान विभागाचा अंदाज खरा ठरला; राज्यात ठीक-ठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी, 28 तारखेपर्यंत ‘असं’ राहणार हवामान, वाचा…

0

Havaman Andaj : महाराष्ट्रातील हवामानात गेल्या काही दिवसांपासून मोठा बदल पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध भागांमध्ये ढगाळ हवामान तयार झाले आहे. दरम्यान हवामान खात्याने आज अर्थातच 26 नोव्हेंबर रोजी राज्यातील विविध भागांमध्ये मुसळधार पावसाचा गारपीटीची शक्यता वर्तवली होती.

यानुसार आज राज्यातील विविध भागांमध्ये सकाळपासूनच हलक्या पावसाला सुरुवात झाली आहे. यामुळे हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला असल्याचे बोलले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील नासिक, अहमदनगर, सातारा जिल्ह्यासह विविध भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.

तर राज्यातील बहुतांशी भागात ढगाळ हवामान तयार झाले आहे. या अवकाळी पावसामुळे मात्र या संबंधित भागांमध्ये शेती पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या अवकाळी पावसाचा प्रामुख्याने फळपिकांवर मोठा विपरीत परिणाम होईल असा अंदाज आहे.

त्यामुळे फळ उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. केळी, डाळिंब आणि द्राक्ष पिकांवर या अवकाळी पावसाचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. दरम्यान हा अवकाळी पाऊस रब्बी हंगामातील पिकांसाठी पोषक ठरू शकतो असेही मत काही तज्ञांनी व्यक्त केले आहे.

तज्ञांच्या मते यावर्षी मान्सून काळात पुरेसा पाऊस झालेला नाही यामुळे सध्याचा अवकाळी पाऊस हा ज्या ठिकाणी मान्सून काळात चांगला पाऊस बरसलेला नाही तेथील भागातील शेती पिकांसाठी नवसंजीवनी देण्याचे काम करणार आहे. दरम्यान आता आपण भारतीय हवामान विभागाने पुढील काही दिवसांसाठी वर्तवलेला हवामान अंदाज थोडक्यात जाणून घेणार आहोत.

आज कुठे पडणार अवकाळी पाऊस

आज राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची आणि गारपीटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यातील नासिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि छत्रपती संभाजी नगर या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी गारपीट आणि मुसळधार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.

याशिवाय आज संपूर्ण कोकण, संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र आणि तुरळक जिल्हे वगळता संपूर्ण मराठवाडा आणि विदर्भात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दरम्यान, उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव नाशिक यासह मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर या जिल्ह्यात उद्या देखील पावसाची तीव्रता अधिक राहणार असे सांगितले जात आहे. याशिवाय हवामान विभागाने 28 नोव्हेंबर पर्यंत राज्यातील विविध भागांमध्ये अवकाळी पाऊस बरसणार असल्याचे सांगितले आहे.

27 अन 28 तारखेला कसं राहणार हवामान?

उद्या उत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकण, मराठवाड्यातील छ. संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड आणि संपूर्ण कोकणात पावसाची शक्यता आहे. उद्या उत्तर महाराष्ट्रातील नासिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर मध्ये पावसाची तीव्रता अधिक राहणार असल्याचा अंदाज आहे.

तर परवा 28 नोव्हेंबरला मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, नांदेड आणि विदर्भातील सर्व 11 जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.