Maharashtralive24.com
Maharashtra Breaking News Updates

ब्रेकिंग ! जाता-जाता मान्सून मनसोक्त बरसणार, पुढील 48 तासात ‘या’ भागात अतिवृष्टीची शक्यता, हवामान खात्याचा ऑरेंज अलर्ट जारी, वाचा सविस्तर

0

Havaman Andaj : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासहित देशभरातील विविध भागांमधून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. आपल्या राज्यातून जवळपास मान्सून माघारी फिरला आहे. देशातील इतरही भागांमधून मान्सूनचा परतीचा प्रवास वेगाने सुरू आहे. यामुळे सध्या महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभरात तापमानात मोठी वाढ झाली आहे आणि ऑक्टोबर हिटचा अनुभव नागरिकांना अनुभवायला मिळत आहे.

ऑक्टोबर हिट मुळे सर्वसामान्य जनता घामाघूम झाली आहे. यामुळे आता थंडीला केव्हा सुरुवात होते हा सवाल सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जात आहे. दरम्यान महाराष्ट्रात आगामी सात ते आठ दिवस अशीच परिस्थिती राहील आणि त्यानंतर हळूहळू तापमानात घट होईल आणि मग थंडीला सुरुवात होईल असे मत तज्ञांच्या माध्यमातून वर्तवले जात आहे.

अशातच मात्र भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून देशातील काही राज्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. देशातील काही भागांसाठी पुढील 48 तास अतिशय महत्त्वाचे राहणार असून काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याच्या माध्यमातून नुकताच वर्तवण्यात आला आहे.

विशेष म्हणजे या पावसामुळे उद्या होणाऱ्या भारत पाकिस्तान मॅच मध्ये व्यत्यय येण्याची शक्यता आहे. कारण की अहमदाबाद येथे उद्या पावसाची शक्यता तयार होत आहे. याव्यतिरिक्त केरळ, तामिळनाडू, कर्नाटक या राज्यांमध्ये देखील पावसाची शक्‍यता आहे.

पुढील 48 तास या भागात जोरदार पाऊस बरसणार

आय एम डी ने दिलेल्या माहितीनुसार येथे 48 तासात कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळ मध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. या राज्यांमधील काही भागात अतिवृष्टी देखील होऊ शकते असा अंदाज आहे. याव्यतिरिक्त 14 आणि 15 ऑक्टोबर रोजी अहमदाबादसह गुजरात मधील उत्तरेकडील काही भागात विखुरलेल्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

यामुळे उद्याचा भारत पाकिस्तानचा हाय व्होल्टेज क्रिकेट सामना पावसामुळे प्रभावित होण्याची शक्यता आहे. याबाबत अहमदाबाद हवामान केंद्राच्या शास्त्रज्ञांनी सांगितल्याप्रमाणे पुढील पाच दिवस गुजरात मध्ये प्रामुख्याने हवामान कोरडे राहणार आहे.

परंतु 14 ऑक्टोबरला अहमदाबाद जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तसेच 15 ऑक्टोबरला गुजरातच्या उत्तर भागात पावसाची शक्यता आहे. यामुळे आता हवामान विभागाचा हा अंदाज खरा ठरतो का आणि भारत पाकिस्तान सामन्यांमध्ये व्यत्यय येतो का हे पाहण्यासारखे राहणार आहे.