hardik pandya
"हार्दिक पांड्या हा भारताचा टी-20 कर्णधार असावा"; माजी क्रिकेटपटूचे मोठे वक्तव्य

मुंबई : भारताचा माजी क्रिकेटपटू मनोज तिवारीने अनुभवी अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्यावर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. हार्दिक पांड्या हा छोट्या फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचा कर्णधार असावा. असे मत व्यक्त केले आहे.

पंड्याने आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सचे नेतृत्व ज्या पद्धतीने केले आहे त्यामुळे मनोज तिवारी खूप प्रभावित झाला आहे. त्यामुळे भविष्यात या फॉरमॅटमध्ये पांड्याने टीम इंडियाचा कर्णधार व्हावा, असे त्यांना वाटते.

हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील गुजरात फ्रँचायझीने पाचपैकी चार सामने जिंकले आहेत. सध्या हा संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानावर कायम आहे. यावेळी हार्दिक पांड्याने खूपच चांगल्या पद्धतीने संघाचे नेतृत्व केले. त्याने बॅट आणि बॉल दोन्हीसह उत्कृष्ट खेळ दाखवला आहे आणि क्षेत्ररक्षणातही जबरदस्त कामगिरी केली आहे. कर्णधारपद मिळाल्यानंतर तो खूप परिपक्व खेळाडू दिसतो आहे.

हार्दिक पंड्याचा हा गुण पाहून मनोज तिवारी खूपच प्रभावित झाला आहे. ट्विटरवर प्रतिक्रिया देताना तो म्हणाला, “छोट्या फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचा कर्णधार कोण असेल किंवा त्या शर्यतीतले खेळाडू कोण असतील यावर कधी वाद निर्माण झाला असेल तर तो हार्दिक पांड्याच असावा. या आयपीएलदरम्यान मी जे काही पाहिले आहे, त्यामुळे त्याच्या कर्णधारपदाने खूप प्रभावित झालो आहे.

राजस्थान रॉयल्सविरुद्ध गुरुवारी झालेल्या सामन्यात हार्दिक पांड्याने चांगली कामगिरी केली. पहिल्या फलंदाजीदरम्यान त्याने अवघ्या 52 चेंडूत 87 धावांची जलद खेळी करत संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेले. यानंतर गोलंदाजीतही त्याने कमाल केली.