नवी दिल्ली : आयपीएल सीझन 15 सुरू होण्यापूर्वी, मेगा लिलाव आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये सर्व संघ मोठ्या खेळाडूंवर दाव लावताना दिसले. विदेशी खेळाडू देखील यात सामील होते. यावर्षीही कोरोनाचा धोका लक्षात घेत बायो बबलचे कठोर नियम बनवण्यात आले आहेत. पण लिलावानंतर काही दिवसांनी एका खेळाडूने बायो बबलचा हवाला देत 15 व्या हंगामातून आपले नाव मागे घेतले. या वर्तनामुळे या खेळाडूला आता त्याच्याच देशाने निलंबित केले आहे.
हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सला आयपीएल सुरू होण्यापूर्वीच मोठा धक्का बसला आहे. इंग्लंडचा धडाकेबाज सलामीवीर जेसन रॉयला गुजरातने 2 कोटी रुपयांना विकत घेतले. पण बायो बबलचा हवाला देत रॉय आयपीएलमधून बाहेर पडला होता. रॉयच्या या वागणुकीमुळे इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) जेसन रॉयवर दोन सामन्यांची बंदी आणि 2,500 पाउंडचा दंड ठोठावला आहे. ईसीबीने मंगळवारी एक निवेदन जारी करून याबाबत माहिती दिली.
जेसनच्या या वागणुकीमुळे इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने जेसनवर ही कारवाई केली असून, शिस्तपालन समितीने जेसनविरोधात हा निर्णय घेतला आहे. ईसीबीने एका निवेदनात म्हटले आहे की, “क्रिकेट शिस्तपालन समितीने जेसन रॉयच्या विरोधात हा निर्णय दिला आहे. जेसननेही त्याच्यावरील आरोप मान्य केले आहेत. जेसनने ECB निर्देश 3.3 चे उल्लंघन केले आहे. निवेदनात पुढे म्हटले आहे की, ‘जेसनला इंग्लंडमधील पुढील दोन सामन्यांमधून निलंबित करण्यात आले आहे ज्यात तो निवडीसाठी उपलब्ध असेल परंतु हे निलंबन 12 महिन्यांचे देखील असू शकते. जरी ते त्याच्या वर्तनावर अवलंबून असेल. याशिवाय त्याच्यावर 2,500 पाउंडचा दंडही ठोठावण्यात आला आहे.
जेसन रॉयची ही आयपीएल मधून बाहेर पडण्याची पहिली वेळ नसून ही दुसरी वेळ आहे. आयपीएल 2020 मध्येही जेसन रॉयने वैयक्तिक कारणांमुळे टूर्नामेंट सोडण्याचा निर्णय घेतला होता. 2020 मध्ये, दिल्ली कॅपिटल्सने त्याला 1.5 कोटी रुपयांना विकत घेतले, परंतु वैयक्तिक कारणांमुळे त्याने माघार घेतली होती.
जेसन रॉयच्या जागी रहमानउल्ला गुरबाज