Maharashtralive24.com
Maharashtra Breaking News Updates

Bummer Success Story: अंडरवेअर विकून महिन्याला 2 कोटी कमवतोय ‘हा’ मुलगा, पहा सक्सेस स्टोरी

येथे आपण अशाच एका स्टार्टअपची सक्सेस स्टोरी पाहणार आहोत ज्यात केवळ फॅन्सी अंडरवेअर विकून दरमहा 2 कोटी रुपये कमवले जातात. आपण येथे Sulay Lavsi यांनी सुरू केलेल्या Bummer या स्टार्टअपबद्दल पाहणार आहोत.

0

Bummer Success Story : आजकाल अनेकांना आपला नवीन स्टार्टअप सुरू करण्याचा विचार मनात येतो. आपल्या देशात स्टार्टअप्सची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. भारतात स्टार्टअप्सची संख्या वाढण्याचे आणखी एक कारण म्हणजे सरकार देखील स्टार्टअप्सना भरपूर सपोर्ट देत आहे.

येथे आपण अशाच एका स्टार्टअपची सक्सेस स्टोरी पाहणार आहोत ज्यात केवळ फॅन्सी अंडरवेअर विकून दरमहा 2 कोटी रुपये कमवले जातात. आपण येथे Sulay Lavsi यांनी सुरू केलेल्या Bummer या स्टार्टअपबद्दल पाहणार आहोत.

* फॅन्सी अंडरवेअरची विक्री

Sulay Lavsi यांनी 2020 मध्ये अहमदाबाद शहरात Bummer स्टार्टअप सुरू केले होते. Bummer ला एक आरामदायक अंडरवेअर ब्रँड बनविणे हे त्यांचे उद्दिष्ट होते. कॉम्फी अंडरवेअर ब्रँड तयार करण्याची कल्पना यांना सुचली, कारण त्यांनी कॅलिफोर्नियाच्या शाळेतून कपडे आणि फॅशन याबाबत शिक्षण घेतले होते. त्यामुळे काहीतरी वेगळं करता यावं म्हणून थोडं वेगळं आणि फॅन्सी अंडरवेअर बनवण्याची कल्पना त्याला सुचली. यातूनच म्हणूनच त्यांनी Bummer ब्रँड सुरू केला.

* हे आहेत प्रोडक्ट्स

Bummer सुरू करण्या मागचा Sulay यांचा मुख्य हेतू काही वेगळ्या प्रकारच्या Underwears बनवून विकणे हा होता, त्यामुळे त्यांच्या कंपनीत तयार होणारी सर्व अंडरवेअर अतिशय फॅन्सी असतात. रेग्युलर अंडरवेअरऐवजी वेगवेगळ्या डिझाईन्स आणि कलरच्या अंडरवेअर बनवून त्याची विक्री सुरू केली, त्याचे खूप सकारात्मक परिणाम दिसून आले.

* Shark Tank India मध्ये सहभाग

Sulay यांना भारतातील प्रसिद्ध बिझनेस शो शार्क टँक इंडियामध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. शार्क टँक इंडिया सीझन 1 मध्ये सर्वांनी त्यांना पाहिलं. त्या शो मध्ये ते आपल्या Bummer व्यवसायासाठी ७५ लाख रुपयांचा फंड मिळवण्यासाठी गेले होते. Sulay यांमधील व व्यवसायामधील चांगली क्षमता पाहून शार्क टँक इंडिया शोचे परीक्षक अमन गुप्ता आणि नमिता थापर यांनी त्यांना ७५ लाख रुपयांचा फंड दिला आणि ते बंमर व्यवसायाचा भाग बनले.

* महिन्याला 2 कोटींची कमाई

Sulay Lavsi यांनी Bummer ची सुरवात जेव्हा केली होती तेव्हा सुरुवातीच्या काळात ते वर्षाला 60 लाख रुपये कमवत होते. पण शार्क टँक इंडियामध्ये गेल्यानंतर त्यांची ग्रोथ वाढ झपाट्याने झाली. 2023 मध्ये आतापर्यंत त्यांनी 11 कोटींची विक्री केली होती.