GST Collection : (GST Collection) सप्टेंबर या महिन्यात GST मध्ये जबरदस्त वाढ झाली आहे. या महिन्यात करोडोंमध्ये GST वसुली झाली आहे. ऑगस्टच्या मानाने यावेळीचा GST हा जास्त आहे.

अर्थ मंत्रालयाने शनिवारी सप्टेंबर (September)2022 साठी वस्तू आणि सेवा कर (GST) संकलन डेटा जारी केला. मंत्रालयाने म्हटले आहे की, सप्टेंबरमध्ये 26 टक्क्यांनी वाढ होऊन ते 1.47 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले आहे. सप्टेंबर 2022 मध्ये जीएसटी संकलन 1,47,686 कोटी रुपये होते. मात्र, त्यातही ऑगस्टच्या तुलनेत वाढ झाली आहे. ऑगस्ट महिन्यात जीएसटी संकलन 1,43,612 कोटी रुपये होते.

अर्थ मंत्रालयाने ट्विटरवरून ही माहिती दिली आहे. अर्थ मंत्रालयाच्या मते, सप्टेंबर 2022 मध्ये एकूण GST महसूल 1,47,686 कोटी रुपये जमा झाला आहे.

जीएसटी (GST)महसूल 26% वाढला

सप्टेंबर 2022 चा महसूल मागील वर्षीच्या याच महिन्यातील GST (GST) महसुलापेक्षा 26 टक्के अधिक आहे. या महिन्यात, वस्तूंच्या आयातीतून मिळणारा महसूल 39 टक्क्यांनी जास्त होता आणि देशांतर्गत व्यवहारातून (सेवांच्या आयातीसह) महसूल हा मागील वर्षाच्या याच महिन्यात या स्रोतांमधून मिळालेल्या महसुलापेक्षा 22 टक्क्यांनी जास्त होता.

सप्‍टेंबर महिन्‍यात जमा करण्‍यात आलेल्‍या एकूण GST महसुलापैकी CGST रु. 25,271 कोटी, SGST रु. 31,813 कोटी, IGST रु. 80,464 कोटी (वस्तूंच्या आयातीवर जमा झालेल्या रु. 41,215 कोटींसह) आणि सेस रु. 10,137 कोटी ( 856 कोटींचा समावेश आहे).

7 महिन्यांत 1.4 लाख कोटी रुपयांहून अधिक कलेक्शन

हा सलग 8वा महिना आहे आणि सलग सातव्या महिन्यात मासिक जीएसटी महसूल 1.4 लाख कोटी रुपयांहून अधिक झाला आहे. सप्टेंबर 2022 पर्यंत जीएसटी महसुलातील वाढ मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 27% आहे, जी खूप उच्च उडी दर्शवते. ऑगस्ट 2022 मध्ये, 7.7 कोटी ई-वे बिले झाली, जी जुलै 2022 मधील 7.5 कोटी पेक्षा किरकोळ जास्त होती.

एप्रिलमध्ये सर्वाधिक कलेक्शन

ऑगस्ट महिन्यात 1,43,612 कोटी रुपये GST संकलन झाले आहे. त्याच जुलैमध्ये जीएसटी संकलन 1,48,995 कोटी रुपये होते. तर जून महिन्यात जीएसटी संकलन १,४४,६१६ कोटी रुपये होते. एप्रिल महिन्यात जीएसटी संकलन 1,67,540 कोटी रुपये होते, जे आतापर्यंतचे सर्वाधिक आहे.