मुंबई बाहेरच्या आमदारांना म्हाडातर्फे मुंबईतील गोरेगावमध्ये घरे देण्यात येणार आहेत, अशी घोषणा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत केली.

म्हाडातर्फे गोरेगावमध्ये सुमारे ३०० घरे बांधण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. गोरेगाव मधील म्हाडाच्या ताब्यातील जमिनीवर हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे.

मुंबईत आमदार निवास पाठोपाठच आमदारांच्या घरांचा प्रश्न सतत चर्चेत असतो. म्हाडाच्या योजनेतून आमदारांना घरे मिळावीत, असा अग्रह धरला जातो.

तसेच नागरिकांसाठीच्या घरकूल योजनेत आमदारांना कोटा नको, असे सांगून त्याला विरोधही होत असतो. या पार्श्वभूमीवर आता सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

मुंबई आणि मुंबई उपनगर वगळता राज्यातील इतर भागातील आमदारांना यातून घर मिळणार आहे. सुमारे तीनशे घर येथे बांधली जाणार आहेत.