Google : गुगलने (Google) नुकतीच आपली एक सिरीज (Google Pixel Series) लॉन्च केली आहे. ज्यामध्ये गुगलने आपला पहिला फोल्डेबल फोन (Foldable Phone) लॉन्च करणार आहे. जाणून घ्या या फोनचे सर्व फीचर्स. 

हे पण वाचा :- दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर ओलाचा धमाका, लवकरच लॉन्च करणार सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कुटर

Google ने एका इव्हेंटमध्ये Google Pixel 7 सीरीज लॉन्च केली आहे आणि त्यासोबत Google ने Google Pixel Watch आणि Next Generation Tensor G2 चिप देखील लॉन्च केली आहे. या इव्हेंटमध्ये गुगलच्या पहिल्या टॅबलेटबद्दलही माहिती देण्यात आली आहे जो 2023 मध्ये लॉन्च होण्याची शक्यता आहे.

Google Pixel Foldable माहिती

रॉस यंगच्या मते, पिक्सेल फोल्डेबल वर्ष 2023 च्या पहिल्या तिमाहीत सादर केले जाईल. Google च्या फोल्डेबल फोनचे अधिकृत नाव पिक्सेल फोल्डेबल आहे, परंतु वर्षाच्या सुरुवातीला आलेल्या एका अहवालात त्याचे नाव पिक्सेल नोटपॅड असे असेल. काही रिपोर्ट्सनुसार, गुगलच्या या आगामी फोल्डेबल फोनची किंमत सॅमसंगच्या फोल्डेबल फोनपेक्षा कमी असू शकते. अद्याप त्याच्या वैशिष्ट्यांबद्दल कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

हे पण वाचा :- या बँकेला मोठा झटका, RBI ने रद्द केले लाइसेंस.. 

Google Pixel Foldable Phone तपशील

रिपोर्ट्सनुसार, हा फोन लूकमध्ये OPPO Find N फोल्डेबल फोनसारखा असू शकतो. बाहेरील बाजूस, यात 64Ml मेगापिक्सेल Sony IMX787 मुख्य सेन्सर तसेच 12 मेगापिक्सेल अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर आणि 10.8 मेगापिक्सेल टेलीफोटो लेन्स असू शकतात.

तसेच, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 10.8 मेगापिक्सेल कॅमेरा असू शकतो. फोनच्या आतील बाजूस 8-मेगापिक्सेलचा Sony IMX355 कॅमेरा मिळण्याची अपेक्षा आहे. या फोनमध्ये 12GB पर्यंत रॅम आणि 512GB पर्यंत बिल्ट-इन स्टोरेज मिळू शकते.

हे पण वाचा :- खुशखबर, दिवाळीच्या मुहूर्तावर ‘या’ इलेक्ट्रिक स्कुटरवर मिळतीये जबरदस्त सूट..