मुंबई : आपल्या गाण्यांनी प्रेक्षकांना तालावर नाचवणारी गायिका ध्वनी भानुशालीचे लाखोच्या घरात चाहते आहेत. तिच्या प्रत्येक गाण्याची चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. तर आता ध्वनीच्या चाहत्यांसाठी नुकतीच एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ध्वनी लवकरच आता गायना व्यतिरिक्त अभिनय क्षेत्रातही आपली कला दाखवणार आहे. तर चाहत्यांनो सज्ज राहा तुमच्या ध्वनीला पडद्यावर पाहण्यासाठी.

वृत्तानुसार, ध्वनी भानुशाली तिच्या मोठ्या प्रक्षेपणाची तयारी करत आहे आणि सध्या अभिनय आणि तंत्राच्या विविध पैलूंवर काम करत आहे. तिला तिचे वडील विनोद भानुशाली लॉन्च करतील अशी शक्यता आहे. विनोद भानुशाली यांनी नुकतीच टी-सीरिज सोडली होती. T-Series सह 27 वर्षांच्या दीर्घ सहवासानंतर त्यांनी स्वतः चे ‘भानुशाली स्टुडिओ लिमिटेड’ प्रॉडक्शन हाऊस लाँच केले आहे. यातुनच ध्वनी मोठ्या पडद्यावर आपले पाऊल ठेवेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. ध्वनीला चित्रपटात पाहण्यासाठी तिचे चाहतेही खूप उत्सुक झाले आहेत.

दरम्यान, वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ध्वनी भानुशालीने अनेक चित्रपटांसाठी गाणी गायली आहेत. यासोबतच ती म्युझिक व्हिडिओंमध्येही दिसली आहे. ध्वनी भानुशाली नुकतेच संगीत दिग्दर्शक युवान शंकर राजा यांच्यासोबत पहिले एकल ‘कँडी’ घेऊन आली आहे. हे गाणे हिंदी आणि तमिळ अशा दोन्ही व्हर्जनमध्ये गायले आहे.