मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री जुही चावला हे 90 च्या दशकातील सुपरहिट जोडप्यांपैकी एक मानले जात होते. या दोघांच्या मैत्रीचे किस्से ही आपल्याला माहीत आहेत. मात्र, गेल्या बराच काळापासून या दोघांची जोडी पडद्यावर एकत्र झलकळी नाही. यादरम्यान जुही शाहरुख पुन्हा आपल्याला सोबत पाहायला मिळणार असल्याच्या बातम्या येत होत्या. यावर आता अभिनेत्री जुही चावलाने मौन सोडले आहे.

माध्यमांशी बोलताना जुही चावलाला शाहरुख खानसोबत पुन्हा काम करण्याबाबत विचारले असता, जुही म्हणाली, “मलाही करायचं आहे. हा प्रश्न तू शाहरुखला का विचारत नाहीस. पुढच्या वेळी तो समोर आल्यावर त्याला जुहीसोबत काम करायला सांग.” अस जुही म्हणाली.

शाहरुख आणि जुहीने ‘राजू बन गया जेंटलमन’, ‘डर’, ‘राम जाने’, ‘येस बॉस’, ‘वन 2 का 4’, ‘डुप्लिकेट’ आणि ‘फिर भी दिल है हिंदुस्तानी’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. त्यानंतर शाहरुख आणि जुही शेवटचे ‘झिरो’ चित्रपटात दिसले होते. या जोडीची जादू पुन्हा एकदा ऑनस्क्रीन पाहण्यासाठी त्यांचे चाहतेही खूप उत्सुक आहेत.