FLIPKART SALE
FLIPKART SALE

फ्लिपकार्ट (Flipkart) प्रत्येक सणानिमित्त वेगवेगळ्या बंपर ऑफर घेऊन येत असतो. अशातच होळीच्या निमित्ताने फ्लिपकार्ट सेलमध्ये ग्राहकांना स्मार्टफोन्सवर (Smartphones) बंपर डिस्काउंट मिळणार आहे. जर तुम्ही नवीन फोन घेण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही फ्लिपकार्टवर उपलब्ध असलेल्या या डीलचा फायदा घेऊ शकता. आज आपण इथे जाणून घेऊया फ्लिपकार्ट सेलमधील सर्वोत्तम डील्सबद्दल…

या सेलमध्ये Asus, OPPO, POCO, Realme व्यतिरिक्त इतर ब्रँडवरही सूट दिली जात आहे. तसेच या स्मार्टफोन्सशिवाय तुम्ही कमी किंमतीत आयफोन (IPhone) देखील खरेदी करू शकता.

Asus 8z –
नुकत्याच लाँच झालेल्या Asus 8z वर बंपर सूट देण्यात येत आहे. हा फोन ई-कॉमर्स (E-commerce) साइट फ्लिपकार्टवर डिस्काउंटसह उपलब्ध करण्यात आला आहे. या फोनची मूळ किंमत 48,999 रुपये आहे. पण आत्ता तुम्ही हा मोबाईल 6,000 रुपयांच्या सवलतीसह केवळ 42,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता.

OPPO Reno 7 Pro 5G –
OPPO Reno 7 Pro 5G देखील फ्लिपकार्टवर डिस्काउंटसह उपलब्ध करून देण्यात आला आहे. हा मोबाइल सध्या 16% डिस्काउंटसह Rs 39,999 मध्ये मिळणार आहे. बाजारभाव मध्ये याची मूळ किंमत 47,990 रुपये आहे. तर यावर 13,000 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफरही (Exchange offer) दिली जात आहे.

POCO M4 Pro 5G –
POCO M4 Pro 5G मोबाईल देखील फ्लिपकार्टवर अतिशय स्वस्तात विकला जात आहे. 6GB रॅम आणि 128GB स्टोरेजचा हा मोबाइल फ्लिपकार्टवर 15% डिस्काउंटसह 16,999 रुपयांना सूचीबद्ध करण्यात आला आहे. याशिवाय कंपनी यावर 13,000 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफरही देत ​​आहे.

Realme 9 Pro+ 5G –
Realme 9 Pro + 5G हा मोबाईल ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवरून रु. 28,999 मध्ये खरेदी करता येईल. हि किंमत त्याच्या 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज वेरिएंटसाठी आहे. याशिवाय तुम्ही त्यावर बँक डिस्काउंट आणि एक्सचेंज ऑफरसह आणखी सवलत मिळवू शकता.