मुंबई : ‘फुलपाखरू’ फेम अभिनेत्री हृता दुर्गुळेने काही महिन्यांपूर्वी प्रतीक शाहसोबत साखरपुडा केला होता. लवकरच हे कपल आता लग्न करणार असल्याची बातमी येत आहे. ही बातमी ऐकून हृताचे चाहते खूप खुश झाले आहेत.
नुकतंच समोर आलेल्या मीडिया रिपोर्टनुसार, मराठी सिरियल्सच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर एक रिपोर्ट शेअर करण्यात आला आहे. त्यानुसार, हृता दुर्गुळे आणि प्रतीक शाह येत्या मे महिन्यात म्हणजेच पुढच्या महिन्यात लग्नगाठ बांधणार आहेत. हे दोघेही आपल्या लग्नासाठी फारच उत्सुक आहेत.
हृताने साखरपुड्याच्या काही दिवस आधी प्रतीकसोबतचा फोटो शेअर करत, आपण रिलेशनशिपमध्ये असल्याचा खुलासा केला होता. त्यांनतर हृता दुर्गुळेने बॉयफ्रेंड प्रतिक शाह याच्याशी 24 डिसेंबर रोजी साखरपुडा केला होता. प्रतीक हा हिंदी मालिकांमधील लोकप्रिय अभिनेत्री मुग्धा शाह यांचा मुलगा आहे. त्याने अनेक लोकप्रिय हिंदी मालिकांचं दिग्दर्शन केलं आहे.