chenne super kings
Good news for Chennai fans; 'Ha' star player admitted to Surat camp

नवी दिल्ली : आयपीएल सुरु होण्यापूर्वीच चेन्नई सुपर किंग्सचे काही खेळाडू दुखापतीमुळे सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये सहभागी होणार नव्हते. दरम्यान, आता चेन्नई सुपर किंग्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. सलामीवीर ऋतुराज गायकवाडचा आता संघात समावेश झाला आहे, तो बुधवारी सुरतला पोहोचला. सुरतला जाण्यापूर्वी त्याने स्वतः इंस्टाग्राम स्टोरीवर फोटो शेअर केला आणि सांगितले की, तो सीएसके कॅम्पमध्ये सामील होण्यासाठी जात आहे. ऋतुराज गायकवाड अजूनही एनसीएमध्ये फिटनेसवर मेहनत घेत होता.

ऋतुराज गायकवाड श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या टी-20 मालिकेत सहभागी झाला होता. मात्र, पहिल्या सामन्यात नाणेफेकीच्या काही वेळापूर्वीच त्याने मनगट दुखत असल्याची तक्रार केली होती, त्यानंतर त्याला सामन्यात विश्रांती देण्यात आली होती. नंतर त्याला मालिकेतून वगळण्यात आले आणि मयंक अग्रवालचा समावेश करण्यात आला. त्यानंतर ऋतुराज गायकवाड हा फिटनेस मिळवण्यासाठी एनसीएमध्ये मेहनत घेत होता.

चेन्नई सुपर किंग्ज संघाचे सराव शिबिर 22 मार्चपर्यंत सुरतमध्ये सुरू राहणार आहे. त्यानंतर संघ मुंबईत पोहोचेल. IPL 2022 ची सुरुवात चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामन्याने होणार आहे. पहिला सामना 26 मार्च रोजी होणार आहे.