COVID-19 कॉलर ट्यून
COVID-19 कॉलर ट्यून

आता तुमची कोविड-19 (Covid-19) कॉलर ट्यूनपासून सुटका होईल. दूरसंचार विभागाने (Department of Telecommunications) देशातील सर्व दूरसंचार ऑपरेटर्सना कोरोनाबद्दल माहिती देणारा ट्यून काढून टाकण्यास सांगितले आहे.

कोविड-19 कॉलर ट्यूनचा उद्देश लोकांना कोरोना व्हायरस (Corona virus) बद्दल जागरूक करणे हा होता. आता जवळपास दोन वर्षांनंतर हे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. या कॉलर ट्यूनमुळे अनेक वेळा महत्त्वाचे कॉल करण्यास विलंब होतो. यामुळे नेटवर्कवरही ओव्हरलोड आहे.

29 मार्च रोजी DoT ने सर्व दूरसंचार कंपन्यांना COVID-19 प्री-कॉल घोषणा आणि कॉलर ट्यून (Caller tune) आता काढून टाकण्यास सांगितले आहे. या संदर्भात दूरसंचार विभागाने आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडे परवानगी मागितली होती.

याबाबत आरोग्य मंत्रालया (Ministry of Health) ने परवानगीही दिली आहे. आता दूरसंचार विभागाने सर्व दूरसंचार कंपन्यांना COVID-19 शी संबंधित प्री-कॉल घोषणा काढून टाकण्यास सांगितले आहे. या कॉलर ट्यूनमुळे आणीबाणीसाठी केलेले महत्त्वाचे कॉल्स विलंबाने व्हायचे.

यामुळे दूरसंचार विभागाने निर्णय घेतला आहे की, आता त्याची गरज नाही. लोकांना कोरोनाचे गांभीर्य समजले आहे आणि ते टाळण्याचे मार्गही समजले आहेत. त्यामुळे आता लोकांना त्याची गरज भासत नव्हती.

जे प्रीपेड (Prepaid) आणि पोस्टपेड वापरकर्ते अधिक व्हॉइस कॉल वापरतात त्यांच्यासाठी ही चांगली बातमी आहे. COVID-19 कॉलर ट्यून परत आणण्याची सरकारची कोणतीही योजना नाही. याबाबत आदेश निघाल्यास तो लवकरच काढला जाईल, असे मानले जात आहे. यासाठी कोणतीही निश्चित तारीख नाही.

परंतु जर तुम्ही अजूनही प्री-कॉल घोषणा ऐकत असाल, तर तुम्हाला काहीही करण्याची गरज नाही. ते लवकरच आपोआप काढले जाईल