मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट या दोघांच्या लग्नाच्या बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी हे कपल यावर्षी डिसेंबरमध्ये लग्न करतील असे म्हंटले जात होते. तर त्यानंतर असं समोर आलं की डिसेंबर नाहीतर सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये दोघांचं लग्न होऊ शकतं. या तारखांच्या चर्चा होत असतानाच आलिया-रणबीरच्या लग्नसंबंधीत नुकतीच एक माहिती मिळाली आहे.

माहितीनुसार, एप्रिल 2022 मध्ये हे कपल लग्न करेल. मीडिया अहवालात सूत्रांच्या माहितीनुसार असे म्हटले आहे की, रणबीर कपूरची आई अभिनेत्री नीतू कपूर यांना सेलेब्रिटी डिझायनर मनिष मल्होत्राच्या स्टोअरमध्ये स्पॉट करण्यात आले आहे. तर मनिष मल्होत्रा देखील त्यांच्या घरी आला होता. मिळालेल्या माहितीनुसार शूटिंगमध्ये व्यस्त असणाऱ्या या कपलने आपापल्या फिल्म्सच्या शेड्यूलमधून सुट्टी देखील मागितली आहे. मात्र यावर अद्यापही अधिकृत माहिती मिळालेली नाही.

दरम्यान, अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांचे लग्न 2021 सालीच होण्याची योजना होती. मात्र कोरोनामुळे हे लग्न होऊ शकले नाही. आलियासोबतच्या लग्नावर एका मुलाखतीत रणबीरने वक्तव्य केले होते. त्याने यावेळी म्हंटले होते की, “आतापर्यंत आलिया सोबत माझं लग्न झालं असतं. पंरतु कोरोनाच्या कारणामुळे अजून लग्न झालेलं नाही. पण मी अलियाला पत्नी म्हणून स्विकारले आहे”, असे रणबीर म्हणाला होता.