मुंबई : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन सध्या त्याच्या आगामी ‘विक्रम वेधा’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट तमिळ हिट ‘विक्रम वेधा’चा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन पुष्कर आणि गायत्री या जोडीने केले आहे, ज्यांनी मूळ चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखनही केले आहे. या चित्रपटात राधिका आपटेसह सैफ अली खान विक्रमच्या भूमिकेत आहे, तर अभिनेता हृतिक रोशन वेधाच्या भूमिकेत दिसणार आहे.
दरम्यान, अभिनेत्याने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केलाआहे. ज्यामध्ये तो वेधच्या लूकमध्ये खूपच डॅशिंग दिसत आहे. सेलेब्सपासून ते चाहते त्याचे कौतुक करत आहेत, तर हृतिकची कथित गर्लफ्रेंड सबा आझादनेही त्याच्या फोटोंवर कमेंट केली आहे.
हृतिक रोशनने त्याच्या इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये तो ब्लॅक लूकमध्ये दिसत आहे. त्याने ट्रेंडी ब्लॅक डेनिमसह काळा टी-शर्ट घातला आहे आणि सनग्लासेस घातलेला दिसत आहे. हृतिकने त्याचे लांब केस पोनीटेलमध्ये बांधले आहेत. तसेच अभिनेत्याचा लूक त्याच्या बिअर्डमुळे पूर्ण झाला आहे.
त्याच्या इंस्टाग्रामवरून फोटो शेअर करताना हृतिक रोशनने कॅप्शनमध्ये लिहिले, “ब्रेकिंग इनर वेधा’. नेहमीप्रमाणेच हृतिकच्या पोस्टवर एकामागून एक कौतुकाचा वर्षाव होत आहे. स्टायलिस्ट अक्षय त्यागीने प्रतिक्रिया दिली आहे, “उफ्फ! तर जायद खानने लिहिले, ‘किलिंग इट ब्रदर’! त्याचप्रमाणे हृतिक रोशनची कथित गर्लफ्रेंड सबा आझादने देखील त्याच्या पोस्टवर प्रतिक्रिया दिली आणि लिहिले, “why hello यासोबतच तिने हार्ट इमोजी देखील पोस्ट केला आहे.