General Knowledge :(General Knowledge) आपण अनेकदा सिनेमा (Movie )पाहायला जातो. अनेकदा आपल्याला तिकीटाची किंमत कमी जास्त होताना पाहायला मिळतात. याच मुख्य कारण तिकीटावरील टॅक्स हे असतं. जाणून घ्या सिनेमांच्या तिकीटाची किंमत आणि टॅक्समधील हे गणित.

राज्य सरकारकडून काही चित्रपट करमुक्त केले जातात, त्यामुळे तिकिटांचे दर कमी होतात. चित्रपटाच्या तिकिटावरील कराची एकूण टक्केवारी आणि करात राज्य आणि केंद्र सरकारचा वाटा किती आहे.

चित्रपटाच्या तिकिटावरील कराचे सोपे गणित

चित्रपटाच्या (Movie )तिकिटांवर त्यांच्या सामान्य किमतींव्यतिरिक्त कर आकारला जातो. मूळ किंमत ही सामान्य किंमत किंवा कर नसलेली किंमत आहे. याशिवाय तिकिटावर दोन प्रकारचे कर आहेत. एक केंद्र सरकार आणि दुसरे राज्य सरकार. ज्याला CGST आणि SGST म्हणतात.

चित्रपटाच्या तिकिटावरील (Movie tickets) कर त्याची मूळ किंमत, SGST आणि CST जोडून मोजला जातो. 100 रुपयांपर्यंतच्या तिकिटांवर एकूण 12 टक्के कर आकारला जातो, तर यापेक्षा जास्त किमतीच्या तिकिटांवर 18 टक्के कर आकारला जातो.

करमुक्त असताना किमती किती कमी होतात? (Tax Free)

राज्य सरकारे चित्रपट करमुक्त करतात हे तुम्ही अनेकदा पाहिले असेल. यामुळे चित्रपटाच्या कलेक्शनला फायदा तर होतोच, पण लोकांना स्वस्त तिकिटेही मिळतात. कारण राज्याकडून आकारला जाणारा एसजीएसटी तिकिटांच्या किमतीतून काढून टाकला जातो.

अलीकडे अनेक चित्रपट करमुक्त (Tax Free) करण्यात आले

त्याच वर्षी म्हणजेच 2022 मध्ये प्रदर्शित झालेला ‘द काश्मीर फाइल’ हा चित्रपट अनेक राज्यांमध्ये करमुक्त करण्यात आला होता. या चित्रपटाला चित्रपटगृहांमध्ये अनपेक्षित यश मिळाले आणि तो वर्षातील सर्वात मोठ्या चित्रपटांपैकी एक आहे. विविध राज्य सरकारे वेळोवेळी सामाजिक विषयावरील चित्रपट करमुक्त करत असतात.