मुंबई : अभिनेत्री आलिया भट्टचा ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपट बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटाच्या डायलॉगवर रिल्स बनवण्याचा तर ट्रेंडच सुरू झाला आहे. या ट्रेंडमध्ये अनेक लहान मुलांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरलं होत आहेत. असाच एक लहान मुलीचा व्हिडिओ अभिनेत्री कंगना रनौतने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर करत आलिया भट्टवर निशाणा साधत व्हिडिओवर आक्षेप घेतला होता. यावर आता आलियाने नुकतेच कंगणाला सुनावले आहे.

व्हायरलं झालेला हा व्हिडिओ जेव्हा कंगनाने पाहिला तेव्हा तिने हा व्हिडिओ तिच्या इन्स्टा स्टोरीवर टाकला होता आणि लिहिले की, ‘इतक्या लहान मुलीने तोंडात बिडी दाबून सेक्स वर्करची नक्कल करणे योग्य नाही. अशा प्रकारे हजारो मुलांचा वापर या चित्रपट प्रोमोशनसाठी केला जात आहे. सरकारने या मुलांच्या पालकांवर कारवाई करावी.’ तसेच, ही पोट कंगनाने महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांना टॅग केली होती.

दरम्यान, कंगणाच्या या पोस्टवर आता आलियाची प्रतिक्रिया आली आहे. याबद्दल बोलताना आलीय म्हणाली, “मला तो व्हिडिओ क्यूट वाटला. व्हिडिओ पाहून तर असेच वाटते की तो कुठल्यातरी मोठ्यांच्या उपस्थितीत बनवला आहे. जर मुलीच्या आई-वडिलांना यात काही अडचण नसेल, तर आपल्याला ही त्यावर काही हरकत नसावी.” असे बोलत आलियाने कंगणाला सडेतोड उत्तर दिले आहे.

‘गंगुबाई काठियावाडी’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून कंगना आलिया भट्टवर सतत निशाणा साधताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच कंगणाने या चित्रपटात आलियाला कास्ट केल्यामुळे चित्रपटाला याचे नुकसान होणार आहे, असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यावर आलियाने एकदम सरळ पध्दतीने उत्तर देत म्हंटले होते की, “मी काही बोलण्यापेक्षा करून दाखवण्यात विश्वास ठेवते. चित्रपट प्रदर्शित झाल्यावर बघू”, अश्या साध्या शब्दात आलियाने कंगणावर जोरदार टोला मारला होता.