मुंबई : इरफान खान हा इंडस्ट्रीतील असा अभिनेता होता, ज्याला विसरणे अशक्य आहे. 2020 मध्ये, या अभेनेत्याने जगाचा निरोप घेतला पण त्याच्या कुटुंबाला आणि चाहत्यांना आजही त्याला विसरणे कठीण जात आहे. यातच बॉलीवूड मेगास्टार अमिताभ बच्चन आपला सहकलाकार इरफान खानची आठवण करून भावूक झाले आहेत.
अमिताभ बच्चन आणि इरफान खान यांनी 2015 साली ‘पिकू’ चित्रपटात एकत्र काम केले होते. या चित्रपटात त्यांच्यासोबत दीपिका पदुकोणही दिसली होती. अलीकडेच बिग बींना इरफानची आठवण झाली तेव्हा त्यांनी मुलगा बाबिलला पत्र लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या.
अमिताभ बच्चन यांनी लिहिलेले पत्र बाबिलने सोशल मीडियावर शेअर केले आहे. “अमिताभ बच्चन यांनी १७ मार्च २०२२ रोजी इरफान खानच्या मुलाला हे पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी आपल्या मनातील अनेक गोष्टी लिहिल्या आहेत. त्यांनी लिहिले, ‘माझ्या प्रिय बाबिल, जीवन क्षणिक आहे आणि मृत्यू विशाल आहे, परंतु मैत्री मृत्यूपेक्षा मोठी आहे. प्रिय व्यक्तींसोबतच्या आठवणी कधीच विसरता येत नाहीत. कधी त्यांची आठवण कधी आनंदात तर कधी दु:खात येते. या अशा काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला नेहमी त्यांच्याशी जोडून ठेवतात. तुझे वडील मोठे व्यक्तिमत्व होते. असे पत्र अमिताभ यांनी इरफानच्या मुलाला लिहिले आहे. बाबिलने हे पत्र त्याच्या इन्स्टा स्टोरीवर शेअर केले आहे.
2018 मध्ये इरफान खानला न्यूरोएन्डोक्राइन नावाच्या दुर्मिळ कर्करोगाने ग्रासलं असल्याचं निदान झालं होतं. तेव्हापासून त्याच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्यावर लंडनमध्ये प्रथम उपचार करण्यात आले, त्यानंतर ते भारतात परत आले. 29 एप्रिल 2020 रोजी इरफानने अखेरचा श्वास घेतला.