dhoni kohli
Former RCB captain writes emotional post for Dhoni

मुंबई : महेंद्रसिंग धोनीने चेन्नई सुपर किंग्जचे कर्णधारपद सोडले आहे. आयपीएल 2022 सुरू होण्याच्या 2 दिवस आधी त्याने हा निर्णय घेतला. त्याने अष्टपैलू रवींद्र जडेजा याला आपला उत्तराधिकारी बनवले आहे. धोनीने CSK चे कर्णधारपद सोडल्यानंतर क्रिकेट विश्वात जोरदार चर्चा होत आहे. धोनी इंडिया प्रीमियर लीगचा दुसरा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली सीएसकेने चार वेळा विजेतेपद पटकावले आहे.

धोनी असा क्रिकेटर आहे ज्याच्याकडून शेकडो खेळाडूंनी प्रेरणा घेतली आहे. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीनेही CSK च्या कर्णधारपदाचा कार्यकाळ शानदार असल्याचे वर्णन केले आहे. किंग कोहली हा अशा क्रिकेटपटूंपैकी एक आहे जो धोनीचा खूप आदर करतो. विराट एकदा म्हणाला होता की एमएस धोनी नेहमीच त्याचा कर्णधार असेल.

धोनीने सीएसकेचे कर्णधारपद सोडल्यानंतर आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहलीने सोशल मीडियावर एक थ्रोबॅक फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले, ‘पिवळ्या जर्सीत एका शानदार कर्णधारपदाचा शेवट. कर्णधारपदाचा असा एक अध्याय चाहते कधीही विसरणार नाहीत. तुमच्याबद्दल नेहमीच आदर राहील.” विराटच्या या ट्विटला चाहत्यांनीही प्रचंड पसंती दिली आहे.