मुंबई : रंगांचा सण होळीला सुरुवात झाली आहे. रंगांचा हा सण आपल्यासोबत खूप आनंद घेऊन येतो. तसेच यावेळी हा महोत्सव अनेक टीव्ही सेलिब्रिटींसाठीही खूप खास असणार आहे. गेल्या वर्षभरापासून अनेक टीव्ही सेलिब्रिटींनी लग्न केले आहे. हे सेलिब्रिटी पहिल्यांदाच आपापल्या पार्टनरसोबत होळी साजरी करणार आहेत. या सेलिब्रिटींमध्ये मौनी रॉय-सूरज नांबियार, अंकिता लोखंडे-विकी जैन ते करिश्मा तन्ना आणि वरुण बंगेरापर्यंत अनेक टीव्ही जोडप्यांचा समावेश आहे.
करिश्मा तन्ना आणि वरुण बंगेरा या वर्षी फेब्रुवारीमध्ये विवाहबद्ध झाले. लग्नानंतर दोघे पहिल्यांदा एकत्र होळी साजरी करणार आहेत.
अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांचा विवाह गेल्या वर्षी 14 डिसेंबरला झाला होता. लग्नानंतर दोघांनी नवीन वर्ष, ख्रिसमस, मकर संक्रांत असे अनेक सण साजरे केले. आता दोघेही पहिल्यांदाच एकत्र होळी साजरी करणार आहेत.
राहुल वैद्य आणि दिशा परमार हे त्यांच्या लग्नानंतर टीव्हीचे सर्वात लोकप्रिय सेलिब्रिटी आहेत. गेल्या वर्षी जुलैमध्ये दोघांचा विवाहसोहळा पार पडला होता. आतापर्यंत या दोघांनी दिवाळी, मकर संक्रांती हे सण एकत्र साजरे केले आहेत. आता दोघेही पहिल्यांदा एकत्र होळी साजरी करणार आहेत.