Flying Car : आतापर्यन्त फक्त रस्त्यावरून चालणारी वाहने पहिली होती, मात्र आता लवकरच हवेतून चालणारी इलेक्ट्रिक फ्लाइंग कार (Flying Car) येणार आहे. दुबईमध्ये इलेक्ट्रिक फ्लाइंग कार X2 सादर केली आहे. जाणून घ्या या कारबद्दल.

हे पण वाचा :- आता या कंपनीच्या फोनलाही मिळणार 5G सपोर्ट, जाणून घ्या.. 

एक्स-2 फ्लाइंग कार

ही उडणारी कार चीनची इलेक्ट्रॉनिक वाहन निर्माता कंपनी Xpeng Inc ने बनवली (X2 Flying Car) आहे. दुबईत पहिल्यांदाच ही कार सर्वांसमोर सादर करण्यात आली. याशिवाय कंपनी भविष्यात इलेक्ट्रिक विमाने लाँच करण्याच्या प्रकल्पावरही काम करत आहे.

X2 इलेक्ट्रिक फ्लाइंग कारमध्ये 2 लोक प्रवास करू शकतात. या कारच्या चारही कोपऱ्यांवर बसवण्यात आलेल्या 8 प्रोपेलरच्या मदतीने ही कार व्हर्टिकल टेक ऑफ आणि लँडिंग (eVTOL) करताना हवेत उडू लागते. ही कार जास्तीत जास्त 130 किमी प्रतितास वेगाने टेक ऑफ करण्यास सक्षम आहे. सध्याच्या पॉवर क्षमतेमुळे ही कार हवेत 90 मिनिटे उडू शकते.

हे पण वाचा :- डुकाटीच्या ‘या’ जबरदस्त एडवांस्ड मॉडल बाईकची झाली एंन्ट्री, जाणून घ्या फीचर्स 

हे आहेत फायदे

आजकाल या कारमुळे शहरांमधील रहदारीपासून सुटका होऊ शकते
पॉइंट टू पॉइंट टेक ऑफ आणि लँडिंग आणीबाणीच्या काळात खूप प्रभावी ठरेल.
एअर अॅम्ब्युलन्स सारख्या कामासाठी फ्लाइंग कार हा देखील चांगला पर्याय आहे.
कमी अंतरासाठी खूप उपयुक्त ठरू शकते.

हे पण वाचा :- भारतीय विमानतळ प्राधिकरण येथे नोकरीची सुवर्णसंधी, असा करा अर्ज