Flipkart Big Billion Days : फ्लीटकार्टवर (Flipkart) बिग बिलियन डेज (Big Billion Days) सेल सुरु झाले असून. या सेलमध्ये स्मार्टफोन्स, स्मार्ट टीवी (Smart TV)आणि अनेक इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्सवर धमाकेदार सूट मिळत आहे. फ्लिपकार्टच्या या ऑफेरद्वारे फक्त 2,499 रुपयात तुम्ही 40 इंच स्मार्ट टीव्ही खरेदी करू शकता. फ्लिपकार्टची ही ऑफर 30 सप्टेंबरपर्यंत आहे. जर तुम्ही नवीन टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही ऑफर तुम्हाला फायद्याची ठरू शकते.

फ्लिपकार्टच्या (Flipkart) या ऑफरद्वारे थॉमसन 9A सीरीजचा 40 इंचाचा टीव्ही ज्याची मूळ किंमत ही 22 हजार रुपये आहे. हा स्मार्ट टीव्ही तुम्हाला फक्त 2,499 रुपयांना मिळू शकतो.

थॉमसन 9A सीरीज 40 इंच स्मार्ट टीव्हीची लॉन्चिंग किंमत 21,499 रुपये आहे परंतु फ्लिपकार्टवर 14,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. टीव्हीवर पूर्ण 30% सूट दिली जात आहे. त्यानंतर अनेक बँक आणि एक्सचेंज ऑफर आहेत, ज्यामुळे टीव्हीची किंमत खूपच कमी होईल.

थॉमसन 9A सीरीज 40 इंच स्मार्ट टीव्ही (Smart TV)खरेदी करण्यासाठी तुम्ही ICICI बँक किंवा Axis बँक कार्ड वापरल्यास तुम्हाला 1,500 रुपयांची सूट मिळेल. त्यानंतर एक एक्सचेंज ऑफर देखील आहे, ज्यामुळे टीव्हीची किंमत आणखी कमी होईल.

थॉमसन 9A सीरीज 40 इंच स्मार्ट टीव्हीवर 11 हजार रुपयांची एक्सचेंज ऑफर आहे. जर तुम्ही जुना टीव्ही बदललात तर तुम्हाला खूप सूट मिळेल. पण यासाठी टीव्हीची स्थिती चांगली असणे आणि मॉडेल नवीन असणे गरजेचे आहे. तरच तुम्हाला 11 हजार रुपयांची सूट मिळेल.