मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री सनी लिओनी तिच्या चित्रपटांमुळे आणि सोशल मीडियावरील तिच्या पोस्टमुळे कायम चर्चेत असते. आता नुकताच सनीच्या बहुप्रतिक्षित चित्रपट ‘OMG’ अर्थात ‘Oh My Ghost’ चा फर्स्ट लूक समोर आला आहे. दाक्षिणात्य अभिनेता विजयने सनी लिओनीच्या चित्रपटाचे हे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे.

‘Oh My Ghost’ या चित्रपटाच्या फर्स्ट लूकमध्ये सनी लिओनीची बेधडक आणि बोल्ड स्टाइलमध्ये दिसत आहे. शेअर केलेल्या पोस्टरमध्ये सनीने हातात खंजीर धरला आहे. अभिनेता विजयने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर चित्रपटाचे पोस्टर शेअर करत चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन केले आहे. तसेच, या पोस्टला कॅप्शन देत विजयने लिहिले, “सनी लिओनीच्या ‘ओह माय घोस्ट’ चित्रपटाचा फर्स्ट लूक शेअर करताना आनंद झाला. संपूर्ण टीमचे अभिनंदन.

सनीनेही तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर ‘Oh My Ghost’ चे पोस्टर शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, “प्रत्येक राणीचा इतिहास असतो, पण ती रहस्याची राणी असते.” सनी लिओनी या चित्रपटात राणीच्या भूमिकेत दिसणार आहे. आता या चित्रपटात कोणते रहस्य दडलेलं आहे, हे चित्रपट सिनेमागृहात आल्यावर सर्वांना समजेल.

View this post on Instagram

A post shared by Sunny Leone (@sunnyleone)

दरम्यान, ‘Oh My Ghost’ हा चित्रपट एक तमिळ हॉरर कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन युवान यांनी केले असून चित्रपटात सनी लिओनीशिवाय कॉमेडियन सतीश, योगी बाबू, संजना, दर्श गुप्ता आणि टिळक रमेश देखील दिसणार आहेत.