देशातील सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची बँक ऑफ बडौदाने ठेवींवरील व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन नियमानुसार 2 कोटींपेक्षा कमी ठेवींवरील व्याज दरात वाढ करण्यात आली आहे. बँक ऑफ बडौदाच्या ठेवींवर आता 2.80 टक्के ते 5.55 टक्क्यांपर्यंत व्याज मिळू शकेल.

बँक ऑफ बडौदाच्या नवीन व्याज दरांनुसार आता ग्राहकांना 181 दिवस ते 270 दिवसांच्या एफडीवर 4.30 टक्के व्याज मिळेल. 271 दिवस ते 1 वर्षापेक्षा कमी एफडी वर 4.4 टक्के व्याज मिळेल. 1 वर्ष ते 3 वर्षापर्यंतच्या एफडीवर 5.1 टक्के व्याज दिले जात आहे. बँक ऑफ बडौदा 3 वर्षाहून अधिक आणि 10 वर्षा पर्यंतच्या एफडीवर 5.35 टक्के व्याज अदा करत आहे.

बँक ऑफ बडौदा ज्येष्ठ नागरिकांना सामान्य ग्राहकांच्या पेक्षा अधिक व्याज दर देत आहे. ज्येष्ठ नागरिकांना डोमेस्टिक टर्म डिपॉझिटवर अतिरिक्त 0.50 टक्के व्याज दिले जात आहे.5 ते 10 वर्षाच्या एफडीवर ज्येष्ठ नागरिकांना 6.35 टक्के व्याज दिले जात आहे.

बँक ऑफ बडौदाचे नवे व्याजदर
• 7 ते 14 दिवस – 2.80 टक्के
• 15 ते 45 दिवस- 2.80 टक्के
• 46 ते 90 दिवस – 3.70 टक्के
• 91 ते 180 दिवस- 3.70 टक्के
• 1 वर्ष – 5.00 टक्के

बचत खात्याचे व्याजदर
1 लाख रुपयांच्या रकमेवर 2.75 टक्के
1 लाख रुपयांहून अधिक रकमेवर 2.75 टक्के