Vinayak Raut
Vinayak Raut

शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी अखेर ब्राम्हण समाजासमोर नतमस्तक होत माफी मागितली आहे. “आमचे हिंदुत्व शेंडी-जानव्याचे नाही’ या त्यांच्या वक्तव्याचे पडसाद राज्यभर उमटले होते.

नगरमध्ये तर त्यांच्याविरूदध दशक्रिया विधी घालून आंदोलन करण्याचा इशारा जिल्हा ब्राम्हण सेवा संघाने दिला होता. राज्यभरातूनही निषेध करण्यात येत होता.

या पाश्वभूमीवर खासदार राऊत यांनी आज औरंगाबादमध्ये ब्राह्मण समाजाची भेट घेतली. तेथे त्यांनी आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली.

ते म्हणाले की, ‘कळत नकळत माझ्या तोंडून उद्गार निघाले. त्यात कोणाचाही अनादर करणे हा उद्देश नव्हता. मी आज नतमस्तक होऊन माफी मागायला आलो.

ब्राह्मण समाजाची माफी मागतो. तुमचा कृपा आशीर्वाद कायम ठेवा. काही चूक झाली असेल तर माफ करा,’ असे म्हणत राऊत यांनी माफी मागितली आहे.