मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर सध्या तिच्या प्रेग्नंसीचा आनंद घेत आहे. सोनमने आज ( 21 मार्च ) सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांसोबत ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. या बातमीवर आता सोनम कपूरचे वडील आणि अभिनेता अनिल कपूर यांनी आजोबा झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे.

अनिल कपूरने सोमवारी आपल्या ट्विटर हँडलवर सोनम कपूरचे चार फोटो शेअर केले. यातील दोन फोटोंमध्ये सोनमचा पती आनंद आहुजाही दिसत आहे. अनिल कपूरने या पोहोचला दिलेल्या कॅप्शन सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. ‘आता माझ्या आयुष्यातील सर्वात रोमांचक नानाजीच्या भूमिकेसाठी तयारी करत आहे. आपले जीवन पुन्हा पूर्वीसारखे होणार नाही आणि अधिक कृतज्ञ होऊ शकत नाही. सोनम कपूर आणि आनंद आहुजा तुम्ही आम्हाला या अविश्वसनीय बातमीने खूप आनंदित केले आहे.’ असं सुंदर कॅप्शन अनिल यांनी दिले आहे.

दरम्यान, सोनम कपूर आणि आनंद आहुजा लग्नाआधी अनेक वर्षे ते एकमेकांना डेट करत होते. सोनम कपूर आणि आनंद आहुजा यांची 2014 साली मैत्री झाली आणि त्यानंतर दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडू लागले. अखेर दोघांनी 8 मे 2018 रोजी विवाह केला. आता सोनम 4 महिन्याची गरोदर आहे. माहितीनुसार येत्या ऑगस्टमध्ये ती एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे.