मुंबई : अभिनेत्री कंगना राणौतचा ‘लॉकअप’ हा शो सध्या चांगलाच चर्चेत आहे. शोमध्ये स्पर्धक टिकून राहण्यासाठी रोज वेगवेगळे खुलासे करताना दिसत आहेत. याचदरम्यान
कंगना राणौतच्या वादग्रस्त शोमधून आणखी एक धमाकेदार प्रोमो समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये पूनम पांडे सायेशा शिंदेसोबत बोलताना मुनव्वर आणि अंजलीच्या नात्याबद्दल बोलत असल्याचे पाहायला मिळत आहे.
रिलीज झालेल्या प्रोमोमध्ये पूनम पांडे म्हणताना दिसते की, ‘तिने कोविड महामारीदरम्यान 2 वर्षांत चार रील बनवल्या आणि लोकप्रिय झाल्या. मला याचा काही फरक पडत नाही. तीच्यासाठी माझी मैत्री मनापासून होती. माझी तर इच्छा आहे, असा मित्र माझ्या शत्रूंनाही सापडू नये.’
पुढे प्रोमोमध्ये पूनम पांडे मुनावर फारुकीबद्दल म्हणताना दिसते की, ‘हा… मुनावर. तीला वाचवतो. लग्न लपवून तो २१ वर्षीय मुलीला फसवत आहे. हे खरे आहे आणि तुला अडकवून ठेवले आहे.’ यानंतर पूनम पांडे सायशाबद्दल बोलताना दिसली. पूनम पांडे म्हणते, ‘तिचा एक बॉयफ्रेंड आहे आणि तरीही ती या सर्व गोष्टी करत आहे. किमान मी स्वत:चे संरक्षण करण्यासाठी माझ्या मित्रांचा वापर करत नाही.’ असे हे संभाषण या प्रोमोमध्ये दिसते. यात पूनमने मुनावरच्या लग्नाबद्दल केलेलं वक्तव्य सध्या खूप व्हायरल होत आहे. आता येत्या काळात या एपिसोडमध्ये काय काय आणखी खुलासे होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.