Ashwagandha farming
Ashwagandha farming

विदर्भातील बहुतांश शेतकरी (Farmers) आपल्या शेतात मूग, कापूस, तूर आणि सोयाबीनची लागवड करताना दिसतात. मात्र या सगळ्यात वाशिम (Washim) जिल्ह्यातील करंजी गावात राहणारे शेतकरी अमोल व्यास (Amol Vyas) यांनी त्यांच्या शेतात अश्वगंधा पिकाची लागवड केली आहे.

या वनस्पतीची लागवड करणारे ते त्यांच्या जिल्ह्यातील पहिले शेतकरी आहेत. अशा प्रकारे त्यांनी इतिहास रचला आहे.

शेतकरी अमोल व्यास सांगतात की, जंगली प्राणी अश्वगंधा (Ashwagandha) पीक खात नाहीत. सध्या त्यांनी 30 हजार खर्चून एक एकरात अश्वगंधा पिकाची लागवड केली आहे.

त्याची पाने (Leaves), मुळे या सर्वांचा आयुर्वेदिक औषध बनवण्यासाठी उपयोग होतो. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना या प्लांटमधून दुप्पट नफा सहज मिळू शकतो.

ते पुढे म्हणतात की, पूर्वी मी पारंपरिक शेती (Traditional farming) करायचो. सोशल मीडियावर अश्वगंधा लागवडीची माहिती घेतल्यानंतर मी 1 एकरात अश्वगंधा पिकाची लागवड करण्याचा विचार केला.

आयुर्वेदिक गुणधर्मामुळे प्राणी हे पीक अजिबात खराब करत नाहीत. ते म्हणाले की, संपूर्ण पीक 4 महिन्यांत तयार होईल. अमोल यांच्या म्हणण्यानुसार, 30 हजार रुपये खर्च केल्यानंतर त्यांना 70 हजार रुपयांचा नफा अपेक्षित आहे.