मुंबई : सोनू सूद अनेकदा त्याच्या ट्विट किंवा फोटोंमुळे सोशल मीडियावर चर्चेत असतो. तसेच चाहते अभिनेत्याकडे नेहमी आगळ्या वेगळ्या गोष्टींची मागणी करतात. अशातच आता सोनू सूदच्या एका चाहत्याने अशीच एक मजेशीर मागणी केली आहे. सध्या उन्हाळ्या खूप असल्याने सोनू सूदच्या चाहत्याने त्याच्याकडे चक्क थंड बिअर मागितली यावर अभिनेत्याने देखील मजेशीर उत्तर दिले आहे.
सोनू सूदने गेल्या दोन वर्षांत कोरोनाच्या काळात खूप लोकांना मदत केली आहे. लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या अनेकांना त्याने त्यांच्या घरी आणले आणि अनेकांना मेडिकलसह अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या. सोनू सूदला मदतीची विनंती केली तर तो नक्कीच मदत करतो.
अशा परिस्थितीत, एक मीम शेअर करताना, त्याच्या चाहत्याने विचारले की या कडक उन्हात सोनू सूद कुठे आहे? त्यावर लिहिले होते, ‘जे हिवाळ्यात ब्लँकेट दान करतात, ते उन्हाळ्यात थंड बिअर नाही देणार?.’
चाहत्याच्या या मीमवर अभिनेत्यानेही मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे. हे मीम शेअर करत त्याने लिहिले आहे, बिअरसोबत भुजिया चलेगा? सोनू सूदच्या या उत्तराने चाहत्यांचा दिवस उजाडला. तसेच या ट्विटवर आणखी एका चाहत्याने कमेंट केली आहे, भुजिया सोबत बिअर पिणे आवश्यक आहे का? सोनू सूदने केलेल्या या ट्विटवर नेटकरी जोरदार कमेंट करत आहेत.
सोनू सूदच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर तो सध्या एमटीव्ही रोडीजमध्ये व्यस्त आहे. त्याने नवीन सीझनमध्ये रणविजय सिन्हा याची जागा घेतली आहे जो गेल्या 18 वर्षांपासून या शोला जज करत होता. सोनू सूदने एका निवेदनात लिहिले की, ‘रोडीजचे शूटिंग सुरू करताना मला खूप आनंद होत आहे. हा एक रिअॅलिटी शो आहे ज्याला मी नेहमीच फॉलो करत आलो आहे.”
8 एप्रिलपासून नवीन सीझन सुरू होणार आहे. दुसरीकडे, चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर, अक्षय कुमार स्टारर ‘पृथ्वीराज’ या चित्रपटात सोनू सूद महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. पृथ्वीराजची कथा मोहम्मद घोरीशी युद्ध करणाऱ्या पृथ्वीराज चौहानवर आधारित आहे.
पृथ्वीराज 3 जूनला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमार पृथ्वीराज चौहानची भूमिका साकारणार आहे, तर माजी मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. हा चित्रपट या वर्षी 3 जून रोजी हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषेत रिलीज होणार आहे.