
मुंबई : ‘मास्टर’ फेम थालापति विजयचे चाहते त्याच्या आगामी ‘बीस्ट’ चित्रपटाच्या ट्रेलरची बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत होते, जो आता रिलीज झाला आहे. व्हिडीओ पाहून चाहते फक्त खूश झाले नाहीत. तर ट्रेलर ट्विटरवर सुपरट्रेंड करत आहे आणि हजारो वापरकर्ते ते शेअर करून त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत.
#ThalapathyVijay आत्तापर्यंत युजर्सनी 1 लाख ट्विट केले आहेत. दुसरीकडे, जर आपण ट्रेलरच्या व्ह्यूजबद्दल बोललो तर, 16 तासांत 2 कोटी (2.3 कोटी) पेक्षा जास्त म्हणजेच 23 दशलक्ष लोकांनी तो पाहिला आहे. ही फक्त यूट्यूबची आकडेवारी आहे तर इंस्टाग्रामची आकडेवारी वेगळी आहे.
अभिनेत्याचा मास्टर हा चित्रपट कोरोना महामारीच्या काळात बॉक्स ऑफिसवर रिलीज होऊनही अनेक विक्रम मोडले आणि त्याचप्रमाणे त्याचा पुढचा चित्रपट बिस्ट देखील अनेक रेकॉर्ड मोडेल असा अंदाज लावला जात आहे. कारण, त्याचा ट्रेलर पाहून अभिनेत्याचे चाहते वेडे झाले आहेत आणि आता चित्रपटगृहात आल्यानंतर ‘द बीस्ट’ला दमदार ओपनिंग मिळणार असल्याचे दिसते आहे. द बीस्टच्या पहिल्या ट्रेलरने इंटरनेटवर जंगलातील आगीप्रमाणे कब्जा केला आहे. नेल्सन दिलीपकुमार दिग्दर्शित हा चित्रपट या महिन्यात 13 एप्रिल रोजी थिएटरमध्ये रिलीज होत आहे.
बीस्टच्या ट्रेलरमध्ये विजयची अॅक्शन पाहिल्यानंतर हजारो चाहत्यांनी तामिळनाडूच्या रस्त्यांवर गर्दी करायला सुरुवात केली आहे. चित्रपटाचा ट्रेलर दर्शविण्यासाठी, चित्रपटगृह आणि रस्त्यांवर मोठे स्क्रीन लावण्यात आले होते, त्यानंतर लोक उत्सवाच्या वातावरणात मग्न झालेले दिसतात.
Its not a Movie Release…#BeastTrailer Release Celebration pics
Stardom 🙏#BeastTrailer #Beast @actorvijay pic.twitter.com/T1DHP1o7Jv
— ACTOR VIJAY FANS CLUB (@Actor_VijayFC) April 2, 2022
बॉलीवूडमध्ये हे क्वचितच पाहायला मिळते, पण आपल्या आवडत्या सुपरस्टारला अशाप्रकारे सेलिब्रेट करणे दक्षिणेत सामान्य आहे. बीस्टमध्ये थालापति विजय सुपरस्पायची भूमिका निभावणार आहे.